ETV Bharat / bharat

RBI Deputy Governor : आरबीआय डेप्युटी गव्हर्नरचा कार्यकाळ वाढवला एका वर्षासाठी, जाणून घ्या मायकल पात्रा यांच्याबद्दल - Michael Patra tenure extended for one year

भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर मायकल देवब्रत पात्रा यांना एक वर्षाची मुदतवाढ (Michael Patra tenure extended for one year) मिळाली आहे. केंद्र सरकारने त्यांची एका वर्षासाठी नव्याने नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ 14 जानेवारी 2023 रोजी संपणार होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) डेप्युटी गव्हर्नर मायकल देवव्रत पात्रा यांची नियुक्ती विरल आचार्य (Viral Acharya) यांच्या राजीनाम्यानंतर करण्यात आली होती.

RBI Deputy Governor
मायकल पात्रा
author img

By

Published : Jan 10, 2023, 2:48 PM IST

नवी दिल्ली : केंद्राने सोमवारी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल देवब्रत पात्रा यांची 15 जानेवारीपासून एका वर्षासाठी पुनर्नियुक्ती केली. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हा निर्णय घेतला आहे. मायकल देवब्रत पात्रा (RBI Deputy Governor Michael Patra) 1985 पासून बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. पात्रा यांनी 14 जानेवारी 2020 रोजी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी केंद्रीय बँकेत विविध पदांवर काम केले आहे.

जाणून घ्या मायकल पात्रा यांच्याबद्दल (Who is the deputy governor of RBI) : मायकल पात्रा कार्यकारी संचालक म्हणून रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीचे (Monetary Policy Committee) सदस्य होते. त्यांच्याकडे भारतातील चलनविषयक धोरण निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डेप्युटी गव्हर्नर म्हणून ते एमपीसीचे (ex-officio member of MPC as Deputy Governor) सदस्य राहतील. याआधी, ते जुलै 2012 ते ऑक्टोबर 2014 दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण विभागात प्रमुख सल्लागार होते. मायकल देवब्रत पात्रा यांनी डिसेंबर 2008 ते जून 2012 या कालावधीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक (भारत) यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांनी जागतिक आर्थिक संकट (Global financial crisis) आणि सध्या सुरू असलेल्या युरो सार्वभौम (euro sovereignty) कालावधीत काम केले आहे.

पात्रा यांची नियुक्ती विरल आचार्य यांच्या राजीनाम्यानंतर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) डेप्युटी गव्हर्नर मायकल देवव्रत पात्रा यांची नियुक्ती विरल आचार्य (Viral Acharya) यांच्या राजीनाम्यानंतर करण्यात आली होती. पात्रा यांनी 14 जानेवारी 2020 रोजी डेप्युटी गव्हर्नर (deputy governor) म्हणून योगदान दिले होते. कोरोना संकटानंतर देशाची अर्थव्यवस्था (economy of country) सुधारण्यासाठी सातत्याने पावले उचलली जात आहेत.

2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा : आगामी 2024 लोकसभा निवडणुका (Loksabha Election) लक्षात घेऊन 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (budget of financial year) अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अर्थ मंत्रालयासोबतच आरबीई (RBE) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका अर्थसंकल्पात खूप महत्त्वाची असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून नव्या व्यक्तीची नियुक्ती करण्याऐवजी सध्याचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देवव्रत पात्रा (Michael Patra tenure extended for one year) यांची एका वर्षासाठी नव्याने नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.