ETV Bharat / bharat

'महाविकास आघाडीचे नाही, तर महावसुलीचे सरकार' रविशंकर प्रसाद यांची टीका

author img

By

Published : Apr 5, 2021, 4:53 PM IST

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नाही. तर महावसुलीचे सरकार आहे, असे ते म्हणाले.

प्रसाद
प्रसाद

नवी दिल्ली - दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुली टार्गेट प्रकरणीमुंबई हायकोर्टाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नाही. तर महावसुलीचे सरकार आहे, असे ते म्हणाले.

रविशंकर प्रसाद यांची पत्रकार परिषद

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी पोलिसांना दर महिन्याला 100 केटी वसुलीचे टारगेट दिले आहे, असे परबीर सिंग यांनी म्हटले होते. दरम्यान यावरून आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण रंगताना दिसले, आणि आज अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे.

स्वतंत्र भारतामध्ये अशी घटना यापूर्वी कधीही घडली नाही. मुंबईतूनच 100 कोटी वसूल करण्यात येत असले. तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती वसुलीचे आदेश असतील. अनिल देशमुखांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा सादर केला. यासंपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी बोलणार? उद्धव ठाकरे गप्प का आहेत?, असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी केला.

एनआयए सचिन वाझे प्रकरणी दररोज नवे खुलासे होत आहेत. कोर्टाने गंभीर असल्याचे मान्य केले आहे. अनिल देशमुख या प्रकरणात सामील आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही सुरुवातीपासूनच निष्पक्ष चौकशीची मागणी करत होतो, असे रविशंकर म्हणाले.

महाविकास आघाडीचे नाही, तर महावसुलीचे सरकार -

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी आमची इच्छा आहे. महाविकास आघाडीचे नाही. तर महावसुलीचे सरकार आहे. अनिल देशमुख यांनी आपल्या राजीनाम्यात नैतिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे लिहले आहे. जर अनिल देशमुख नैतिक कारणावरून राजीनामा देत असतील, तर उद्धव ठाकरे तुमची नैतिकता कोठे आहे?, असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी केला.

काय प्रकरण?

मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला होता. अनिल देशमुख यांनी पोलिसांना दर महिन्याला 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर राज्यातील विरोधीपक्षांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आज याप्रकरणी मुंबई हाय कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अखेर अनिल देशमुख यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला.

हेही वाचा - नैतीकदृष्ट्या पदावर राहणे योग्य नसल्याने राजीनामा दिला -अनिल देशमुख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.