नवी दिल्ली- अँटिलीया प्रकरणात चौकशी सुरू असल्याने राजकीय भूकंपही वाढत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर मोठे राजकीय चेहरे या प्रकरणाशी संबंधित असल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला. सचिन वाझे कोणाच्या दबावाखाली होते? शिवसेनेचे मुख्यमंत्री की शरद पवार?, असा प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला.
केंद्रीय कायदेमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न-
पत्रकार परिषदेत रविशंकर प्रसाद म्हणाले, 'मुंबईचे माजी पोलिस आयुक्तांनी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र लिहिले आहे, ज्यात ते म्हणाले आहेत की महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष दिले होते. एका मंत्र्याचे 100 कोटी लक्ष्य, इतर मंत्र्याचे किती?
सचिन वाझे यांची नेमणूक कोणाच्या दबावाखाली-
ते पुढे म्हणाले, 'सचिन वाझे यांना बरीच वर्षे निलंबित करण्यात आले होते. अनेक वर्षांनंतर त्यांची कोरोनामध्ये नियुक्ती करण्यात आली. भाजपकडून पहिला प्रश्न असा आहे की, सचिन वाझे यांची नेमणूक कोणाच्या दबावाखाली केली गेली होती? हे भ्रष्टाचाराचे प्रकरण नसुन लुटण्याचे ऑपरेशन आहे. हा खंडणीचा गुन्हा आहे. शरद पवारांनी या प्रकरणात काय कारवाई केली.
या प्रकरणात शरद पवारांच्या शांततेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील विधानसभेत सचिन वाझे यांचा बचाव केला. सचिन वाझेचा दर्जा एक एएसआय असून त्त्यांना क्राइम सीआयडीचा प्रभार देण्यात आला आहे. हे स्वतः आश्चर्यचकित करणारे असल्याचे रविशंकर प्रसाद म्हणाले.
हे खुप गंभीर प्रकरण-
एकीकडे मुख्यमंत्री वाझेंचा बचाव करतात. दुसरीकडे गृहमंत्री 100 कोटींच्या वसुलीचे लक्ष देतात. हे खुप गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणाचा तपास प्रामाणिकपणाने करायला हवा. या प्रकरणी शरद पवार यांची भूमिका स्पष्ट होईल आणि मुंबई पोलिसांची भूमिका देखील उघड होईल, त्यामुळे स्वतंत्र एजन्सीकडून या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देखील अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात.
हेही वाचा- परमबीर सिंग प्रकरणाचा राज्य सरकारवर काहीही परिणाम नाही, शरद पवारांची दिल्लीत प्रतिक्रिया