हैदराबाद - अठरा वर्षांवरील नागरिकांना 10 तारखेपासून कोरोना प्रतिबंध लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. त्यात आता मोठी बातमी आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकने आपल्या लसीच्या किंमतीत घट केली आहे. त्यानुसार कोविशील्ड लसीची किंमत 600 रुपयांवर 225 रुपये प्रति डोस करण्यात आली आहे. तर, भारत बायोटेकच्या लसीची किंमत 1200 रुपयांवरुन 225 रुपये केली ( Rates Of Covishield Covaxine vaccine Slashed ) आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक आदर पूनावाला ( CEO Adar Poonawalla ) यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारसोबत आमची चर्चा झाली आहे. त्यानंतर आता खासगी रुग्णालयात नागरिकांना प्रतिडोस साठी 600 ऐवजी 225 रुपये मोजावे लागणार आहे.
-
We are pleased to announce that after discussion with the Central Government, SII has decided to revise the price of COVISHIELD vaccine for private hospitals from Rs.600 to Rs 225 per dose. We once again commend this decision from the Centre to open precautionary dose to all 18+.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We are pleased to announce that after discussion with the Central Government, SII has decided to revise the price of COVISHIELD vaccine for private hospitals from Rs.600 to Rs 225 per dose. We once again commend this decision from the Centre to open precautionary dose to all 18+.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 9, 2022We are pleased to announce that after discussion with the Central Government, SII has decided to revise the price of COVISHIELD vaccine for private hospitals from Rs.600 to Rs 225 per dose. We once again commend this decision from the Centre to open precautionary dose to all 18+.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 9, 2022
भारत बायोटेनकेही किंमती कमी केल्या - कोविशील्डनंतर भारत बायोटेकने देखील मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संयुक्त संचालिका सुचित्रा एला ( Bharat Biotech cofounder Suchitra Ella ) यांनी सांगितले की, यापुढे खासगी रुग्णांलयात कोव्हॅक्सिन लसीच्या प्रतिडोससाठी 1200 रुपयांऐवजी 225 रुपये द्यावे लागतील.
18 वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस - देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंध लसीचा बूस्टर डोस घेता येणार आहे. 10 एप्रिलपासून नागरिकांना हा डोस घेता येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. ज्या नागरिकांना कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत. ते नागरिक खासगी रुग्णालयांत जाऊन कोरोना लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात.
-
We have decided to revise the price of Covaxin from Rs 1200 to Rs 225 per dose for private hospitals, says Suchitra Ella, Joint Managing Director, Bharat Biotech#PrecautionDose pic.twitter.com/cwjre25kPz
— ANI (@ANI) April 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We have decided to revise the price of Covaxin from Rs 1200 to Rs 225 per dose for private hospitals, says Suchitra Ella, Joint Managing Director, Bharat Biotech#PrecautionDose pic.twitter.com/cwjre25kPz
— ANI (@ANI) April 9, 2022We have decided to revise the price of Covaxin from Rs 1200 to Rs 225 per dose for private hospitals, says Suchitra Ella, Joint Managing Director, Bharat Biotech#PrecautionDose pic.twitter.com/cwjre25kPz
— ANI (@ANI) April 9, 2022
हेही वाचा - Cat Murdered Case Pune : पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल