शिमला - नेरवा तालुक्यात दोन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शेजारी राहणाऱ्या तरुणाविरोधात मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली आहे.
घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शालेय विद्यार्थी आहे. तो अल्पवयीन आहे की सज्ञान याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेळण्याचा बहाना करून आरोपी मुलीला घेऊन घराजवळ असणाऱ्या शेतात घेऊन गेला व तेथे मुलीवर अत्याचार केला. मुलीच्या रडण्याच्या आवाजाने तिची आई आली असता आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांनी सांगितले, की पीडित मुलीची मेडिकल तपासणी केली जात आहे. याप्रकरणी आयपीसी कलम 376 व पोक्सो अॅक्ट (POCSO) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.