ETV Bharat / bharat

बलात्काराच्या 'या' घटनांमुळे हादरला होता महाराष्ट्र - NCRB

महाराष्ट्रात सामूहिक बलात्काराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून समोर येत आहे. नुकतिच डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने राज्यातील काही घटनांवर प्रकाश टाकला आहे. या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 26, 2021, 1:06 AM IST

Updated : Sep 26, 2021, 6:54 AM IST

हैदराबाद - महाराष्ट्रात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ चाचली आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) राज्यातील काही घटनांवर प्रकाश टाकला आहे. या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

22 सप्टेंबर, 2021 : अल्पवयीन पीडितेवर 33 नराधमांचा बलात्कार, व्हिडिओ क्लिप दाखवून केले कृत्य

डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपर परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 33 नराधमांनी अत्याचार झाल्याची घटना 22 सप्टेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 33 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार आतापर्यंत 26 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुले असल्याचे समोर आले आहे. उर्वरीत आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

31 ऑगस्ट, 2021 : अल्पवयीन मुलीवर 13 नराधमांनी केला सामूहिक बलात्कार

पीडित मुलगी ही 14 वर्षे वयाची आहे. 31 ऑगस्ट रोजी मित्राला भेटण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात गेली होती. तिथे गेल्यानंतर आरोपींनी मित्राची वाट पाहत असताना तिला घरी सोडण्याचा बहाणा करून रिक्षात बसवून वानवडी परिसरात घेऊन जात आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने आरोपींनी रिक्षामध्ये, निर्जनस्थळी, जंगलात, लॉजवर आणि रेल्वेच्या कार्यालयात नेऊन बलात्कार केला. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान तिच्यावर बलात्कार करण्यात आले होते.

27 ऑगस्ट, 2021 : पुण्यातील जनता वसाहतीत युवतीवर सामूहिक बलात्कार

पुण्यातील जनता वसाहतीत एका 25 वर्षीय युवतीवर चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना 27 ऑगस्ट, 2021 रोजी घडली होती. पुणे शहर पोलिसांनी या प्रकरणी चौघा नराधमांना अटक केली आहे.

13 ऑगस्ट, 2021 : जालना जिल्हात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करत केले चित्रीकरण

जालना जिल्ह्याच्या कंडारी खुर्द (ता. बदनापूर) या गावात दोघांनी 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. ही घटना 13 ऑगस्ट, 2021 रोजी घडली. इतकेच नाही तर बलात्काराचे मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले. तिला याबाबत कोठेही वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करुन बदनाम करण्यात व ठार मारण्याची धमकी दिली. ती रस्त्याच्या कडेले बेशुद्धावस्थेत आढळल्याने नागरिकांनीच याची माहिती पोलिसांनी दिली व हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

29 जुलै, 2021 : अल्पवयीन गतीमंद मुलीवर नागपुरात सहा नराधमांनी केला बलात्कार

नागपुरात एका असल्पवयीन गतीमंद मुलीवर दोनवेळा बलात्कार झाल्याची घटना 29 जुलै व 30 जुलैच्या दरम्यान घटली. घटनेच्या दिवशी 29 जुलैला पीडिता सायंकाळी नाशिकला जायचे म्हणून घरून निघाली आणि मानस चौकात पोहचली. पण, नाशिकला जायला तिच्याजवळ ना पैसे होते ना कसे जायचे हे माहीत होते. यावेळी काही टवाळखोर छेड काढत असल्याचे पाहून एक रिक्षा चालक तिला मदत करतो असे म्हणाला. मदतीच्या नावावर तिला मोमिनपुरा टिमकी भागात राहत असलेल्या खोलीत नेले. त्या खोलीत चौघांनी पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर रिक्षा चालकाने तिला मेयो रुग्णालयाजवळ सोडून पळ काढला. त्यावेळी पुन्हा दोघांनी एकटी असल्याचे हेरले. दोघांनी मोमीनपुरा मार्गावर असलेल्या मेट्रोच्या पुलाखाली एका रिक्षात तिच्यावर दुसऱ्यांदा आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर शुक्रवारच्या पहाटे त्याच भागात सोडले. अशा पद्धतीने सहा जणांनी तिच्यावर अत्याचार केला.

11 जानेवारी, 2021 : नाशकात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, सात जण अटकेत

नाशिकरोड येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी सामूहित बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी एक महिला व एक अल्पवयीन मुलासह एकूण सात जणांना अटक केली.

13 जुलै, 2016 : कोपर्डीत एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार व खून

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील एका 15 वर्षीय मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिचा निर्घृपणे खून केला होता. या प्रकरणी तिघांनाही अहमनगर जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. पण, यावर आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून उच्च न्यायालयात खटला सुरू आहे.

24 जुलै, 2019 : मुंबईत मित्रांनी केलेल्या सामूहिक बलात्कारानंतर तरुणीचा औरंगाबादेत मृत्यू

एका तरुणीवर मुंबईत चार मित्रांनी गुंगेचे औषध पाजून पाशवी बलात्कार केले होते. मात्र, तिने याबाबत घरी सांगितले नव्हते. दोन दिवसांनंतर तिला त्रास होऊ लागल्याने मुंबईतील तिच्या भावाने रुग्णालयात दाखवले. त्यानंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचे तिने सांगितले. उपचारावेळी तिचा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.

28 मे, 2019: आठ महिन्याची गर्भवती असलेल्या महिलेवर सांगली जिल्ह्यात आठ जणांकडून सामूहिक बलात्कार

सातारा जिल्ह्यातील एका आठ महिन्याच्या गर्भवती महिलेवर आठ जणांनी सांगली जिल्ह्यात सामूहिक बलात्कार केला होता.

12 सप्टेंबर, 2021: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडितेची आत्महत्या

अल्पवीयन मुलीने सामूहिक बलात्कार झाल्याने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली आहे. तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर भेदरलेल्या अवस्थेत तिने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसंनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

9 सप्टेंबर, 2021 : साकीनाका बलात्कार प्रकरण

मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खैरानी रोड येथे एका महिलेवर पाशवी बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.

'एनसीआरबी'च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील बलात्कार प्रकरणे

वर्षे2017201820192020
बलात्काराच्या घटना1 हजार 9332 हजार 1422 हजार 2992 हजार 61

Last Updated : Sep 26, 2021, 6:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.