ETV Bharat / bharat

Rape Attempt with Footballer: महिला फुटबॉल खेळाडूवर बलात्काराचा प्रयत्न.. फिरायला निघाली अन् नराधमाने शेतातच ओढले

author img

By

Published : Feb 15, 2023, 3:07 PM IST

बिहारमधील सिवानमध्ये महिला फुटबॉलपटूवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. पीडितेने सिवान जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज देऊन कारवाईची मागणी केली आहे. पीडितेने सांगितले की, तिच्या गावातील तरुणाने ही घटना घडवून आणली होती, त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.

Rape Attempt with Footballer
महिला फुटबॉल खेळाडूवर बलात्काराचा प्रयत्न.. फिरायला निघाली अन् नराधमाने शेतातच ओढले

सिवान (बिहार): बिहारमधील सिवानमध्ये महिला फुटबॉलपटूवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या महिला खेळाडूने देश-विदेशात फुटबॉल खेळून देशाचे नाव लौकिक केले आहे. पीडित महिला खेळाडू ही मैरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. खेळाडूने सिवान जिल्हा दंडाधिकाऱ्यांची भेट घेऊन एक अर्ज दिला, ज्यामध्ये तिने सांगितले की, एका तरुणाने आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गावातील तरुणाने केला प्रयत्न : महिला फुटबॉलपटूने सांगितले की, सोमवारी संध्याकाळी ती नेहमीप्रमाणे गावात फिरायला गेली होती. त्यामुळे गावातील तरुणाने तिला पकडून शेतात ओढले. तेव्हा शिवीगाळ करत तो नराधम तिला म्हणाला की, तू खूप मोठी खेळाडू झालीस. त्यानंतर आरोपीने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. बलात्काराचा प्रयत्न झाल्याने पीडिता जोरजोरात रडू लागली. आरोपींनी पीडितेलाही मारहाण केली. आजूबाजूला लोक येत असल्याचे पाहून तो घटनास्थळावरुन पळून गेला. तिला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे पीडितेने सांगितले.

अनेक स्पर्धामध्ये घेतला आहे भाग: पीडितेने सिवान जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज देऊन कारवाईची मागणी केली आहे. न्याय मागण्यासाठी पीडित महिला पोहोचली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. या महिला खेळाडूने स्पोर्ट्स अकादमीमध्ये राहून तिचे क्रीडा प्रशिक्षण घेतले आहे. 2022 मध्ये, ऑलिम्पिक युनिफाइड या अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. या ऑलिम्पिक युनिफाईड स्पर्धेमध्ये तिने कांस्यपदक जिंकले होते. बिहारमधून ओडिशा आणि राजस्थानमध्येही ही महिला खेळाडू खेळली आहे. त्याचवेळी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत असून, त्याच्या अटकेसाठी छापे टाकण्यात येत आहेत.

बिहारकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग: पीडित महिला फुटबॉल खेळाडू ही बिहार महिला फुटबॉल संघाची सदस्य आहे. ती बिहार संघाकडून अनेक वेळा राष्ट्रीय स्तरावर खेळली आहे. सद्यस्थितीत ही पीडित महिला खेळाडू गावातच राहून क्रीडा अकादमीत सराव करते. बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित महिला खेळाडूने केली आहे. आरोपीला शिक्षा झाल्यास तो पुन्हा कोणत्याही मुलीसोबत असे करण्याचा विचारही करणार नाही, असे तिने जिल्हा दंडाधिकाऱ्याना दिलेल्या अर्जात म्हटले आहे.

हेही वाचा: Mother Daughter Death Live Video: आई- मुलीला घरात जिवंत जाळून मारले.. पहा लाईव्ह व्हिडीओ..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.