हैदराबाद Ramoji Group Statement : मार्गदर्शी चिट फंडमधील शेअर्स धमकावून वळवण्यात आल्याचा आरोप जी युरी रेड्डी यांनी मंगळवारी केला होता. मात्र तक्रारदार हे मूळचे नोएडातील आहेत. ते सध्या हैदराबादला राहतात. तर तक्रार आंध्रप्रदेशातील सीआयडीकडं कशी नोंदवण्यात आली, असा सवाल रामोजी समूहानं उपस्थित करुन तक्रारदाराच्या आरोपातील हवाच काढून टाकली आहे. आंध्रप्रदेश सीआयडीनं तक्रारदाराला मोहरा बनवून ही काल्पनीक कथा रचल्याचा आरोपही रामोजी समूहानं यावेळी केला आहे. तक्रारदारानं आपले शेअर त्याच्या संमतीनं वळते केले होते, असा खुलासा रामोजी समूहानं केला आहे. रामोजी समूहाची प्रतिमा डागाळण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचा आरोपही रामोजी समूहानं गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात केला आहे.
काय आहे प्रकरण : हैदराबाद इथं राहणाऱ्या जी युरी रेड्डी यांनी मार्गदर्शी चिट फंडवर मंगळवारी आरोप केले होते. या आरोपात त्यांनी रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव आणि व्यवस्थापकीय संचालक सी सैलाजा यांच्यावर आरोप केले होते. रामोजी समूहानं बळजबरीनं आणि धमकावून शेअर हस्तांतरित केल्याचा आरोप करत आंध्रप्रदेश सीआयडीकडं तक्रार करण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरुन या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तक्रारदार जी. युरी. रेड्डी यांनी दाखल केलेली 2015 ची तक्रार आणि 10 ऑक्टोबरला आंध्रप्रदेश सीआयडीकडं दाखल केलेली नवी तक्रार यामध्ये मोठी तफावत असल्याचं रामोजी समूहानं स्पष्ट केलं आहे.
रामोजी समूहानं फेटाळले आरोप : जी. युरी. रेड्डी यांनी रामोजी समूहावर लावलेले आरोप रामोजी समूहानं गुरुवारी एक निवेदन जारी करून फेटाळले आहेत. रेड्डी यांनी आंध्रप्रदेश सीआयडीकडं तक्रार दाखल केली आहे. यावर रामोजी समूहानं प्रश्न उपस्थित केला आहे. जी. युरी. रेड्डी हे हैदराबाद इथं राहतात. त्यांनी हैदराबाद इथल्या कंपनी रजिस्ट्रार किंवा एनसीएलटीऐवजी आंध्रप्रदेश सीआयडीकडं का संपर्क साधला, असं रामोजी समूहानं आपल्या निवेदनात विचारलं आहे. आंध्रप्रदेश सीआयडीनं तक्रारदाराला मोहरा बनवून ही आणखी एक काल्पनिक कथा रचल्याचा आरोपही रामोजी समूहानं केला आहे.
तक्रारदार निरक्षर नाही : तक्रारदार जी. युरी. रेड्डी यांनी धमकावून शेअर हस्तांतरण केल्याच्या आरोपाला रामोजी समूहानं फेटाळून लावलं आहे. आपण अनावधनानं ट्रान्सफर अर्जावर स्वाक्षरी केल्याचं तक्रारदारानं नमूद केलं आहे. मात्र तक्रारदार जी. युरी. रेड्डी हे निरक्षर नाहीत. त्यांनी (5H-4) अर्जावर स्वाक्षरी करण्यापूर्वी वकिलांचा सल्ला घेऊन आणि संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करुनच स्वाक्षरी केली आहे. मार्गदर्शी चिट फंडच्या अध्यक्षांना पाठवलेल्या ई मेलची वकिलांकडून तपासणी करण्यात आली होती. तक्रारदार जी. युरी. रेड्डी आणि त्यांचा भाऊ मार्टीन यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतरच त्यांनी (5H-4) अर्जावर स्वाक्षरी केली होती. त्यांचा अर्ज स्वीकारल्यानंतर त्यांनी रामोजी राव यांचे आभार मानले होते, असा दावाही रामोजी समूहाच्या वतीनं निवेदनात करण्यात आला आहे.
सात वर्षानंतर कशी झाली आठवण : तक्रारदार जी. युरी. रेड्डी यांनी आपले शेअर 2016 मध्ये हस्तांतरित केले आहेत. त्यांना जर आपल्या शेअरचं हस्तांतरण चुकीच्या पद्धतीनं झालं असं वाटत असेल, तर त्यांनी योग्य ठिकाणी तक्रार करायला हवी, असंही रामोजी समूहाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र तक्रारदार जी युरी रेड्डी यांनी सध्या दाखल केलेली तक्रार ही मार्गदर्शी चिटफंडला बदनाम करण्यासाठी दाखल केली आहे, असा आरोपही रामोजी समूहाच्या वतीनं करण्यात आला आहे. आंध्रप्रदेशच्या सीआयडीनं दिलेल्या चिथावणी आणि सल्ल्यावरुनच ही तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोपही रामोजी समूहानं केला आहे. सात वर्षापूर्वी हस्तांतरित झालेल्या शेअर्सची तक्रारदाराला आताच कशी आठवण झाली, असंही रामोजी समूहानं आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.
दोन्ही पक्षांद्वारे केला जातो शेअर्सच्या खरेदीचा करार : कंपनीनं प्रतिज्ञापत्राद्वारे विनंती केल्यानुसार समभाग एका भावंडाला हस्तांतरित करण्यापूर्वी कंपनी कायदा 2013 च्या सर्व तरतुदींचं काळजीपूर्वक पालन केलं होतं. त्यानुसारच तक्रारदारानं जमा झालेल्या लाभांशाचा 39 लाख 74 हजार रुपयाचा चेक तत्काळ कॅश केला होता. दोन्ही भावांना त्यांच्याकडं असलेल्या शेअर्सची स्थिती आणि हक्क न मिळालेला लाभांश खात्यात कसा ठेवला गेला, याबद्दल वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे. तक्रारदाराला या प्रकरणाची पूर्ण माहिती आहे. त्यांनी 2016 मध्ये त्यांच्या वकिलांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर जाणीवपूर्वक सर्वकाही केलं, असंही रामोजी समूहाच्या वतीनं जारी केलेल्या निवदेनात नमूद करण्यात आलं आहे. शेअर्स खरेदीचा करार दोन्ही पक्षांद्वारे केला जातो, असंही रामोजी समूहानं यावेळी स्पष्ट केलं आहे.
आंध्रप्रदेश सीआयडीच्या सापळ्यात अडकला तक्रारदार : कायद्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया पार पाडल्यानंतर जी युरी रेड्डीला आंध्रप्रदेशातील सीआयडीच्या सापळ्यात अडकल्याचा आरोप रामोजी समूहाकडून करण्यात आला आहे. 2016 मध्ये हस्तांतरित झालेल्या शेअर्सकडून 2 लाख 88 हजार रुपयाचा धनादेश घेण्याचा विचार बदलला. आपली काही कारणं सांगितली आणि कंपनीला एक पत्र जारी केलं. त्याला त्याच्या पत्रातील तपशील आणि मुद्दे स्पष्टपणानं उत्तर दिलं गेलं होतं, असंही रामोजी समूहानं आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. रामोजी समूहानं जी युरी रेड्डी यांच्याविरोधात रामोजी समूहानं योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती रामोजी समूहाच्या वतीनं यावेळी देण्यात आली आहे.
हेही वाचा-