हैदराबाद - देशभरातील पर्यटकांना भुरळ घालणारे रामोजी फिल्म सिटीची यंदाच्या तेलंगाणा पर्यटन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 27 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय पर्यटन दिवशी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम हैदराबादेतील बेगमपेट येथील प्लाजा हॉटेल येथे पार पडणार आहे. यावर्षी विभागाने 16 श्रेणीसाठी 19 पुरस्कारांची घोषणा केली आहे.
फोर स्टार हॉटेल श्रेणी -
रामोजी फिल्म सिटीसह पंचतारांकित हॉटेल डीलक्स श्रेणीमध्ये वेस्टीन हॉटेल आणि बंजारा हिल्समधील हॉटेल पार्क हयात यांना पुरस्कार मिळणार आहे. त्याचप्रमाणे गोलकोंडा रिसॉर्टने देखील पंचतारांकित हॉटेल श्रेणीत क्रमांक पटकाविला आहे. याव्यतिरिक्त फोर स्टार हॉटेल श्रेणीत दासपल्ला हॉटेल आणि मृगवनी रिसॉर्ट यांना पुरस्कार दिला जाणार आहे.
बेस्ट ग्रीन हॉटेल श्रेणी -
त्याचप्रमाणे थ्री स्टार हॉटेल श्रेणीत लकडी-का-पुल येथील वेस्ट वेस्टर्न अशोक हॉटेलला पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. तर नोवाटेल आणि हैदराबाद इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरला संमेलन केंद्राच्या स्वरूपात निवडण्यात आले आहे. शिवाय बेस्ट ग्रीन हॉटेल श्रेणीत अनुक्रमे तारामती बारादरी पहिला, रामप्पा येथील हरिता हॉटेल दुसरा आणि अलीसागर येथील हरिता लेक व्यू रिसॉर्टने तिसरा क्रमांक पटकावला आहे.