बेंगळुरू - हैदरामधील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीच्या (Ramoji Film City) शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. दक्षिण भारत हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (South India Hotels and Restaurants Association) शुक्रवारी दक्षिण भारतातील हॉस्पिटॅलिटी उद्योगात सर्वोत्तम योगदानासाठी रामोजी फिल्म सिटीला SIHRA पुरस्कार प्रदान केला आहे. हॉटेल्स हा देशातील पर्यटनाचा कणा आहे. हे लक्षात घेऊनच SIHRA ने रामोजी फिल्म सिटीचे, "हॉटेल इंडस्ट्रीतील एक अग्रगण्य नाव ज्यांनी दक्षिण भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे" अशा शब्दांत कौतूक केले आहे. (Ramoji Film City receives best hospitality award)
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार - कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी SIHRA वार्षिक संमेलनाच्या उद्घाटन समारंभात बेंगळुरूमध्ये रामोजी फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक सी विजयेश्वरी यांना हा पुरस्कार प्रदान केला. हॉस्पिटॅलिटी बॉडीच्या वतीने अध्यक्ष के श्यामा राजू म्हणाले की, हॉस्पिटॅलिटी उद्योगातील रामोजी फिल्म सिटीच्या योगदानाला वाव देताना त्यांना अत्यंत आनंद होतो आहे.
तेलंगणा पर्यटन पुरस्कारानेही आहे सन्मानित - देशभरातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या रामोजी फिल्म सिटीला 2021 मध्ये तेलंगणा पर्यटन पुरस्कार देखील मिळाला होता.
जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी - रामोजी फिल्म सिटी ही तब्बल 2,000 एकरमध्ये पसरलेली चित्रपट सृष्टी आहे. येथे अनेक आकर्षणे आहेत. त्यामध्ये थीमॅटिक आकर्षणे, मेक बिलीव्ह लोकल, आकर्षक गार्डन्स, कॅस्केडिंग फव्वारे आणि सर्जनशील मनोरंजनासाठी विविध साधने उपलब्ध आहेत. जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे रामोजी फिल्म सिटीला मान्यता मिळालेली आहे. रामोजी फिल्म सिटी ही अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी उत्तम अशी लोकेशन आहे. येथे सर्वसमावेशक चित्रपटनिर्मितीसाठी सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा आणि व्यावसायिक सेवा एकत्रितपणे दिल्या जातात. ज्यामुळे संपूर्ण त्रास-मुक्त चित्रपट निर्मितीचा अनुभव चित्रपट निर्मात्यांना येतो. रामोजी फिल्म सिटीत कोणत्याही दिवशी एकाच वेळी अनेक चित्रपटांचे शूटिंग करण्याची क्षमता आहे. रामोजी फिल्म सिटीला दरवर्षी किमान १.५ दशलक्ष पर्यटक भेट देतात.