ETV Bharat / bharat

'कोरोनीलची जाहिरात करण्याकरिता बाबा रामदेव यांनी चुकीचा प्रोपागंडा वापरला'

रामदेव यांनी विविध प्लॅटफॉर्ममधून कोरोना उपचार आणि लशीविरोधात विधाने केली आहेत. या उपचार आणि लशीला आयसीएमआर, एम्स आणि आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यांनी डॉक्टरांना फार्मा कंपनीचे एजंट आणि लोकांना मारणारे ड्रग्ज माफियाही म्हटले होते, अशी तक्रार डीएमएने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

Baba Ramdev
बाबा रामदेव
author img

By

Published : Jul 3, 2021, 7:40 PM IST

नवी दिल्ली - दिल्ली मेडिकल असोसिएशनने (डीएमए) सर्वोच्च न्यायालयात बाबा रामदेव यांच्या विरोधात धाव घेतली आहे. रामदेव यांनी कोरोना उपचारावरून अॅलोपॅथी डॉक्टरांविरोधात केलेल्या विधानाबाबतचे गुन्हे एकत्रित करावीत, अशी विनंती डीएमएने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

रामदेव यांनी चुकीची माहिती पसरविल्याने त्यांना कोरोनीलच्या विक्रीतून १ हजार कोटी रुपयांहून अधिक पैसे मिळविणे शक्य झाल्याचा दावा करण्यात येत आहे. रामदेव यांनी विविध प्लॅटफॉर्ममधून कोरोना उपचार आणि लशीविरोधात विधाने केली आहेत. या उपचार आणि लशीला आयसीएमआर, एम्स आणि आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यांनी डॉक्टरांना फार्मा कंपनीचे एजंट आणि लोकांना मारणारे ड्रग्ज माफियाही म्हटले होते, अशी तक्रार डीएमएने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

हेही वाचा-अॅलॉपॅथीवरून देशभरात गुन्हे दाखल झाल्याने रामदेव बाबांची सर्वोच्च न्यायालायत धाव

पुढील आठवड्यात होणार सुनावणी-

गेल्या १५ महिन्यांपासून डॉक्टर हे सुट्टी न घेता रोज १८ तास काम करतात. कोरोना रुग्णांवर चांगले उपचार करण्याकरिता डॉक्टर हे प्रयत्न करतात. बेडची कमी संख्या, औषधे व ऑक्सिजनचा तुटवडा अशा आपत्कालीन परिस्थितीतही डॉक्टरांनी काम केले आहे. डीएमएने ही बाजू मांडल्यानंतर सरन्यायाधीश प्रमुख पीठाने नोटीस बजाविली आहे. या प्रकरणी सुनावणी पुढील आठवड्यात केली जाणार आहे.

हेही वाचा-कोरोनिल किटवरून रामदेव बाबांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून समन्स

रामदेव बाबा यांचे वादग्रस्त विधान -

रामदेव बाबा यांनी अ‌ॅलोपॅथी उपचार पद्धतीला मूर्खपणा असे म्हटले होते. अ‌ॅलोपॅथीच्या अपयशाबद्दलही त्यांनी भाष्य केले होते. ही उपचारपद्धती म्हणजे मूर्खपणा आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे. कोरोनावर उपचारामध्ये हायड्रोक्लोरिक्विन फेल झाले. नंतर प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, फॅबिफ्लू फेल ठरलं. लाखो लोकांचा मृत्यू अ‌ॅलोपॅथीचा उपचार घेतल्यामुळे झाला आहे. जेवढ्या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्यानं आणि रुग्णालयात न गेल्यामुळे झाला. त्यापेक्षा जास्त रुग्ण अ‌ॅलोपॅथी उपचार मिळाल्यानंतरही मृत्युमुखी पडले. त्यामुळे आता अनेक मुत्यूचे कारण अ‌ॅलोपॅथिक उपचार पद्धती आहे, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा-रामदेव बाबासह आचार्य बालकृष्ण या दोघांचाही अॅलोपॅथी उपचाराने वाचला होता जीव

यावर वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले. या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी टि्वट करत आयएमएला २५ प्रश्न विचारले होते. त्यानंतर वाद आणखी वाढला. आयएमएने रामदेव बाबांवर थेट देशद्रोहाचा खटला दाखल करत कडक कारवाई करण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली. दुसरीकडे आयएमएच्या उत्तराखंड शाखेने रामदेव बाबाविरोधात १ हजार कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा दिला.

गुन्हे प्रकरणे एकत्रित करण्याची रामदेव यांची सर्वोच्च न्यायालयात विनंती-

अॅलोपॅथीवर वादग्रस्त विधान केल्याने अडचणीत सापडलेल्या रामदेव बाबांनी कायदेशीर लढाईसाठी पाऊल टाकले आहे. योगगुरू रामदेव यांनी अॅलोपॅथीवर वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांच्याविरोधात देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याविरोधात रामदेव बाबा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.