ETV Bharat / bharat

राम मंदिराच्या उद्घाटनापुर्वी खासदार श्रीकांत शिंदे अयोध्येत; मंदिर उभारणीसाठी दिली 'इतकी' देणगी - पंतप्रधान नरेंद्र मोदीं

MP Shrikant Shinde Visits Ayodhya : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटी रुपयांची देणगी दिलीय.

MP Shrikant Shinde
MP Shrikant Shinde
author img

By ANI

Published : Jan 7, 2024, 6:57 AM IST

अयोध्या MP Shrikant Shinde Visits Ayodhya : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्धाटन होणार आहे. त्यावेळी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून 11 कोटी रुपयांची देणगी देण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत या दोघांनी अयोध्येला जाऊन ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडं हा धनादेश सुपूर्द केलाय. खासदार श्रीकांत शिंदे यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट करत ही माहिती दिलीय.

हा आमचा उत्साह वाढवणारा क्षण : शिंदे गटाकडून धनादेश मिळाल्यानंतर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "महाराष्ट्राच्या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि राम भक्तांच्यावतीनं 11 कोटी रुपयांचा धनादेश दिलाय. ही रक्कम बँकेतही ट्रासन्फर झाल्याचं त्यांनी सांगितलंय. या पैशांची पावतीदेखील त्यांना देण्यात आलीय. हा आमचा उत्साह वाढवणारा क्षण आहे. मी महाराष्ट्रातील जनतेच्याप्रती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रती तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो."

  • आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या पुढाकाराने आज गेल्या अनेक दशकांपासून ज्याची सर्व भारतवासी आतुरतेने वाट पाहात होते, तो क्षण, अर्थातच अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभे राहत आहे. या मंदिर उभारणीच्या संघर्षात आजवर अनेक कारसेवकांचे, शिवसैनिकांचे आणि श्री… pic.twitter.com/GmWfcMqgfA

    — Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) January 6, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज प्रत्यक्षात येत आहे. येत्या 22 तारखेला या मंदिराचं भव्य दिव्य स्वरुपात उद्घाटन पार पडणार आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी योगदान म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना पक्षाच्यावतीनं आणि सर्व महाराष्ट्रवासियांच्यावतीनं 11 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला-शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे

  • #WATCH | Ayodhya, Uttar Pradesh | Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra General Secretary Champat Rai says, "It is a matter of happiness that Maharashtra Minister Uday Samant and Shiv Sena (Eknath Shinde faction) MP Shrikant Shinde came here to hand over a cheque of Rs 11 crore on… https://t.co/YAiYj8a3dE pic.twitter.com/wsk0fP2vH0

    — ANI (@ANI) January 6, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बाळासाहेबांचं स्वप्न प्रत्यक्षात : भेट दिल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील एक्सवर एक पोस्ट करत याची माहिती दिलीय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकारानं आज गेल्या अनेक दशकांपासून ज्याची सर्व देशवासी आतुरतेनं वाट पाहात होते. तो क्षण अर्थातच अयोध्येत श्रीरामाचं भव्य मंदिर उभं राहतंय. या मंदिर उभारणीच्या संघर्षात आजवर अनेक कारसेवकांचं, शिवसैनिकांचं आणि रामभक्तांचं योगदान लाभलंय.

हेही वाचा :

  1. अयोध्येतील राम मंदिराच्या सुरक्षेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही होणार वापर; कशी असेल सुरक्षा व्यवस्था
  2. Ram Mandir in Ayodhya : राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात; गर्भगृहाभोवतीचा प्रदक्षिणा मार्गाचा व्हिडिओ पाहा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.