ETV Bharat / bharat

राम मंदिर उभारणीमुळं 74 टक्के मुस्लिम खूश; नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास, 'या' सर्व्हेतून आलं पुढं - नरेंद्र मोदी

Ram Mandir Consecration : राम मंदिर उभारणीमुळं देशातील राष्ट्रवादी मुस्लीमांना आनंद झाल्याचं एका सर्वेक्षणातून पुढं आलं आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंच या मुस्लिम संघटनेनं गुजरातमधील एका सर्वेक्षणातून हा दावा केला आहे. या सर्वेक्षणातून 74 टक्के मुस्लिम खूश असल्याचा दावा या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे.

Ram Mandir Consecration
संपादित छायाचित्र
author img

By ANI

Published : Jan 14, 2024, 10:39 AM IST

नवी दिल्ली Ram Mandir Consecration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 22 जानेवारीला अयोध्येत हा सोहळा पार पडत आहे. मात्र राष्ट्रवादी मुस्लिम संघटना असलेल्या 'मुस्लिम राष्ट्रीय मंच' ( MRM ) या संघटनेनं अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीमुळं 74 टक्के मुस्लिम खूश आहेत, असा दावा एका सर्वेक्षणातून केला आहे. नरेंद्र मोदी हे सगळ्यात यशस्वी पंतप्रधान आहेत, असाही त्यांचा विश्वास आहे.

देशातील मुस्लीमांचं सर्वेक्षण : गुजरातमधील आयुर्वेद फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट या सर्वेक्षण कंपनीकडून मुस्लिम राष्ट्रीय मंचनं देशातील मुस्लीमांचं सर्वेक्षण केलं आहे. हे देशातील सर्वात मोठं सर्वेक्षण असल्याचा मुस्लिम राष्ट्रीय मंचचा दावा आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा संदर्भ मुस्लिम राष्ट्रीय मंचनं दिला होता. यावेळी त्यांनी " प्रभू राम यांच्याविषयी प्रत्येक मुस्लीमांमध्ये आदर आहे. तर नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत, नरेंद्र मोदी यांचं भारतच नाही, तर संपूर्ण जग ऐकते" असंही मुस्लिम राष्ट्रीय मंचनं दिलेल्या निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे.

मौलाना आणि विरोधी नेत्यांवर बहिष्कार टाकावा : राष्ट्रीय मुस्लिम मंचनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. यावेळी त्यांनी मात्र मुस्लिम धर्माच्या नावावर राजकीय पोळी शेकणाऱ्या मौलाना आणि विरोधी पक्षनेत्यांवर बहिष्कार टाकावा, अशी मुस्लिम समाजातील नागरिकांची इच्छा असल्याचा दावा या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात असंख्य मुस्लिम समाजातील नागरिकांनी उघडपणानं 'जय श्रीराम' असं म्हटल्याचा दावाही या सर्व्हेक्षणातून करण्यात आला आहे.

मंदिराच्या बांधकामावर 74 टक्के मुस्लिम खूश : मंदिराच्या बांधकामावर 74 टक्के मुस्लिम खूश असल्याचा दावाही राष्ट्रीय मुस्लिम मंचनं केलेल्या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. 70 टक्के मुस्लीमांचा मोदी सरकारवर विश्वास आहे. 72 टक्के मुस्लीमांनी विरोधाला कोणताही मुद्दा नाही, असं नमूद केलं आहे. 70 टक्के मुस्लीमांना भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयास आला आहे, असं वाटते. मुस्लिम राष्ट्रीय मंचनं केलेल्या सर्वेक्षणात मोदी सरकारच्या काळात मुस्लिम अधिक सुरक्षित आहेत. या सरकारच्या काळात सर्वांना विकासाची समान संधी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं भाजपावरील विश्वास वाढला आहे, असा दावाही या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. मुस्लिम समुदायाच्या मते "अयोध्येतील राम मंदिर हे हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र आहे. बहुसंख्य लोकांच्या श्रद्धेचा आदर केला पाहिजे," असा दावा या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा राष्ट्रीय सण जाहीर; ममता बॅनर्जी म्हणाल्या, ' भाजपाची नौटंकी'
  2. अयोध्या निमंत्रणाला राजकीय रंग; काँग्रेसने नाकारलं राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण
  3. नागपुरातील श्रीरामाचा असाही एक भक्त; १००१ लोकांच्या हातावर गोंदवतोय 'श्री रामा'चं नाव अन् तेही फ्री

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.