ETV Bharat / bharat

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी करणार 11 दिवसांचा खास उपवास; ऑडिओ शेअर करत देशवासियांना दिला 'हा' संदेश

author img

By ANI

Published : Jan 12, 2024, 1:23 PM IST

PM Modi Special Message : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापने पूर्वी 11 दिवसांचं विशेष अनुष्ठान करणार आहेत. या उपवासाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यांनी एक ऑडिओ संदेश जारी करत देशवासियांना खास संदेश दिलाय.

PM Modi Special Message
PM Modi Special Message

नवी दिल्ली PM Modi Special Message : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी आता फक्त 10 दिवस उरले आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक ऑडिओ संदेश जारी करत खास अनुष्ठाण करणार असल्याचं सांगितलंय.

सोशल मीडियावर केली पोस्ट : सोशल मीडिया 'एक्स'वर (पुर्वीचं ट्विटर) पोस्ट करत पंतप्रधानांनी लिहिलं की, "अयोध्येतील रामललांच्या प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी 11 दिवस उरले आहेत. मी भाग्यवान आहे की, मी या पवित्र सोहळ्याचा साक्षीदार आहे. परमेश्वरानं मला जीवनात भारतातील सर्व लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक साधन बनवलंय. हे लक्षात घेऊन मी आजपासून 11 दिवसांचा विशेष अनुष्ठाण सुरू करत आहे. मी सर्व लोकांकडून आशीर्वाद मागत आहे. या क्षणी, माझ्या भावना शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे. परंतु मी माझ्या बाजूनं प्रयत्न केलाय."

  • अयोध्या में रामलला की प्राण प्रतिष्ठा में केवल 11 दिन ही बचे हैं।

    मेरा सौभाग्य है कि मैं भी इस पुण्य अवसर का साक्षी बनूंगा।

    प्रभु ने मुझे प्राण प्रतिष्ठा के दौरान, सभी भारतवासियों का प्रतिनिधित्व करने का निमित्त बनाया है।

    इसे ध्यान में रखते हुए मैं आज से 11 दिन का विशेष…

    — Narendra Modi (@narendramodi) January 12, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="

अयोध्या में रामलला की प्राण प्रतिष्ठा में केवल 11 दिन ही बचे हैं।

मेरा सौभाग्य है कि मैं भी इस पुण्य अवसर का साक्षी बनूंगा।

प्रभु ने मुझे प्राण प्रतिष्ठा के दौरान, सभी भारतवासियों का प्रतिनिधित्व करने का निमित्त बनाया है।

इसे ध्यान में रखते हुए मैं आज से 11 दिन का विशेष…

— Narendra Modi (@narendramodi) January 12, 2024 ">

मोदींनी ऑडिओच्या सुरुवातीला म्हटलं राम-राम : पंतप्रधान मोदींनी राम-राम या शब्दांनी आपल्या ऑडिओची सुरुवात केलीय. ते पुढं म्हणाले की, "दैवी आशीर्वादामुळं जीवनातील काही क्षण वास्तवात बदलतात. आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि देशभरात पसरलेल्या रामभक्तांसाठी आज एक सुवर्णसंधी आहे. आजूबाजूला श्रीरामाच्या भक्तीचं अद्भुत वातावरण आहे. रामनामाचा जयघोष सर्व दिशांनी ऐकू येत आहे. 22 जानेवारीची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. रामललाच्या अभिषेकाला अवघे 11 दिवस उरले आहेत."

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
  • मी भावूक झालो : पंतप्रधान मोदी त्यांच्या ऑडिओ संदेशात पुढे म्हणाले की, "हा माझ्यासाठी अकल्पनीय अनुभवांचा काळ आहे. मी भावनिक आहे, भावनांनी भारावून गेलेला आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा भावनांमधून जात आहे. मला एक वेगळीच भक्ती वाटत आहे. देवानं मला भारतातील लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक साधन बनवलंय."

हेही वाचा :

  1. राम मंदिर उद्घाटनापुर्वी मुद्रांक व नोंदणी विभागाला 'अच्छे दिन'; वाऱ्याच्या वेगानं होतेय जमिनीची विक्री
  2. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम 16 जानेवारीपासूनच होणार सुरू, कसा होणार अभिषेक?

नवी दिल्ली PM Modi Special Message : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी आता फक्त 10 दिवस उरले आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक ऑडिओ संदेश जारी करत खास अनुष्ठाण करणार असल्याचं सांगितलंय.

सोशल मीडियावर केली पोस्ट : सोशल मीडिया 'एक्स'वर (पुर्वीचं ट्विटर) पोस्ट करत पंतप्रधानांनी लिहिलं की, "अयोध्येतील रामललांच्या प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी 11 दिवस उरले आहेत. मी भाग्यवान आहे की, मी या पवित्र सोहळ्याचा साक्षीदार आहे. परमेश्वरानं मला जीवनात भारतातील सर्व लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक साधन बनवलंय. हे लक्षात घेऊन मी आजपासून 11 दिवसांचा विशेष अनुष्ठाण सुरू करत आहे. मी सर्व लोकांकडून आशीर्वाद मागत आहे. या क्षणी, माझ्या भावना शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे. परंतु मी माझ्या बाजूनं प्रयत्न केलाय."

  • अयोध्या में रामलला की प्राण प्रतिष्ठा में केवल 11 दिन ही बचे हैं।

    मेरा सौभाग्य है कि मैं भी इस पुण्य अवसर का साक्षी बनूंगा।

    प्रभु ने मुझे प्राण प्रतिष्ठा के दौरान, सभी भारतवासियों का प्रतिनिधित्व करने का निमित्त बनाया है।

    इसे ध्यान में रखते हुए मैं आज से 11 दिन का विशेष…

    — Narendra Modi (@narendramodi) January 12, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोदींनी ऑडिओच्या सुरुवातीला म्हटलं राम-राम : पंतप्रधान मोदींनी राम-राम या शब्दांनी आपल्या ऑडिओची सुरुवात केलीय. ते पुढं म्हणाले की, "दैवी आशीर्वादामुळं जीवनातील काही क्षण वास्तवात बदलतात. आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि देशभरात पसरलेल्या रामभक्तांसाठी आज एक सुवर्णसंधी आहे. आजूबाजूला श्रीरामाच्या भक्तीचं अद्भुत वातावरण आहे. रामनामाचा जयघोष सर्व दिशांनी ऐकू येत आहे. 22 जानेवारीची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. रामललाच्या अभिषेकाला अवघे 11 दिवस उरले आहेत."

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
  • मी भावूक झालो : पंतप्रधान मोदी त्यांच्या ऑडिओ संदेशात पुढे म्हणाले की, "हा माझ्यासाठी अकल्पनीय अनुभवांचा काळ आहे. मी भावनिक आहे, भावनांनी भारावून गेलेला आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा भावनांमधून जात आहे. मला एक वेगळीच भक्ती वाटत आहे. देवानं मला भारतातील लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक साधन बनवलंय."

हेही वाचा :

  1. राम मंदिर उद्घाटनापुर्वी मुद्रांक व नोंदणी विभागाला 'अच्छे दिन'; वाऱ्याच्या वेगानं होतेय जमिनीची विक्री
  2. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम 16 जानेवारीपासूनच होणार सुरू, कसा होणार अभिषेक?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.