ETV Bharat / bharat

Rakshit Shrivastav Created History : लडाख ते कन्याकुमारीचे 5200 किमी अंतर 218 दिवसांत पूर्ण, भोपाळमधील रक्षित श्रीवास्तव यांचा विश्वविक्रम - 218 दिवसात 200 किमी प्रवास

रक्षित श्रीवास्तव म्हणाले, की 22 सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी देशाच्या उत्तरेकडील कारगिल लडाख येथून प्रवास सुरू केला. आव्हान मोठे (Traveling 5200 km in 218 days only) होते. पण त्यांच्या घरच्यांनी विरोध केला ( India is safe for tourism) नाही.

रक्षित श्रीवास्तव
रक्षित श्रीवास्तव
author img

By

Published : Jun 4, 2022, 5:45 PM IST

दमोह ( भोपाळ ) - दमोह जिल्ह्यातील नरसिंगगड शहरातील रक्षित श्रीवास्तव याने इतिहास ( Rakshit Shrivastav created history ) रचला आहे. त्यांनी लडाखमधून 218 दिवस पायी प्रवास करत 5200 किमीचे अंतर पूर्ण केले. विशेष म्हणजे रक्षित श्रीवास्तव यांच्या डाव्या पायाला दोन वर्षांपूर्वी एका अपघातात दुखापत झाली ( Traveling on foot from Ladakh to Kanyakumari ) होती. त्यांच्या पायात स्टीलची प्लेट टाकावी लागली होती.

भारताचे नाव उंचावण्याच्या आणि पर्यावरण जागृतीकरिता रक्षित श्रीवास्तव यांनी कठीण आव्हान स्वीकारले. हे आव्हान प्रत्यक्षात पूर्ण केले.

देशाच्या उत्तरेकडील टोकापासून दक्षिणेकडील टोकापर्यंत पायी प्रवास - रक्षित श्रीवास्तव म्हणाले, की 22 सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी देशाच्या उत्तरेकडील कारगिल लडाख येथून प्रवास सुरू केला. आव्हान मोठे (Traveling 5200 km in 218 days only) होते. पण त्यांच्या घरच्यांनी विरोध केला ( India is safe for tourism) नाही. उलट प्रोत्साहन दिले. 28 एप्रिल 2022 रोजी, रक्षित श्रीवास्तव यांनी सलग 218 दिवस पायी चालत देशाच्या विविध राज्यांमधून देशाच्या दक्षिणेकडील कन्याकुमारी गाठली. त्यानंतर आपला प्रवास पूर्ण केला. प्रवास संपल्यानंतर रक्षितने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्यासाठी अर्ज पाठवला होता. त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये समावेश झाल्याची माहिती ऑनलाइन देण्यात आली आहे. त्याचे प्रमाणपत्रही १२ आठवड्यांच्या आत त्यांच्या घरी पोहोचणार आहे.

लडाख ते कन्याकुमारीचे 5200 किमी अंतर 218 दिवसांत पूर्ण

भारत असुरक्षित असल्याचा भ्रम केला दूर - रक्षित श्रीवास्तव म्हणाले, की भारत पर्यटनाच्या दृष्टीने खूप सुरक्षित असल्याचे जगाला दाखवून द्यायचे होते. जगभर पसरलेल्या भारताबद्दलच्या संभ्रमात मी ऐकले होते की भारतात एकट्याने प्रवास करणे सुरक्षित नाही. एकट्याने प्रवास करणाऱ्यांसोबत लूटमार होते. भारत किती सुरक्षित आहे आणि देशातील लोक कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी मला वैयक्तिकरित्या पायी फिरायचे होते.

लोकांनी मला प्रोत्साहन दिले - देशाच्या प्रत्येक राज्यात मला खूप प्रेम मिळाल्याचे रक्षित यांनी सांगितले. ज्यांनी मला प्रेम दिले आणि प्रोत्साहन दिले त्या सर्वांचा मी आभारी आहे. मग ते पंजाब असो, हरियाणा असो किंवा देशातील इतर कोणतेही राज्य, मला सर्वत्र प्रेम मिळाले. . लोक मला रस्त्याने चालताना दिसले की मला त्यांच्या घरी घेऊन जायचे. घरी अन्न द्यायचे. हे सर्व मी एका क्षणात कधीही विसरू शकत नाही. मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण संपूर्ण भारताला कधी ना कधी भेट दिलीच पाहिजे. कारण आपल्या देशात सर्व काही आहे.

पर्यावरणाचादेखील संदेश- रक्षित श्रीवास्तव यांनी सांगितले की दुसरा पर्यावरणाचा हेतू होता. आपल्या देशात लोक सातत्याने झाडे तोडत असल्याचे तुम्ही पाहत आहात. त्यामुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे. संसाधनामध्ये कमालीची घट होत आहे. आपण अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत. तुमच्या घरात, बागेत आणि गावात जिथे जागा असेल तिथे झाडे लावावीत. केरळ आणि राजस्थानमध्ये मला खूप फरक दिसला.

दक्षिणेत भरपूर हिरवळ - राजस्थानमध्ये झाडे फारच कमी आहेत. तिथे इतक गरम होते, की मला रात्री झोपही येत नव्हती. तिथे मला खूप त्रास झाला. केरळला पोहोचलो तेव्हा आजूबाजूला खूप हिरवळ आहे. तेथील वातावरण उष्ण झाल्यानंतरही दिलासा मिळत आहे. हिरवाईमुळे उष्णतेची चाहूल लागत नव्हती. उन्हाळ्यात देशाच्या उत्तरेकडील भागात झाडे तोडल्यामुळे खूप उष्णता असते. पण दक्षिणेत तसे नसते.

हेही वाचा-Vadodara Girl Marriage controversy : स्वत:शीच विवाह करणाऱ्या वडोदरा गर्ल्सचे खरे नाव काय? नावावरून चर्चेला उधाण

हेही वाचा-Boiler Explosion in Hapur : उत्तर प्रदेशातील हापूर येथे रासायनिक कारखान्यात स्फोट, 6 जणांचा मृत्यू

हेही वाचा-Hyderbad Gang Rape Case : हैदराबाद बलात्कार प्रकरणात दोघांना अटक; तीन अल्पवयीन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.