ETV Bharat / bharat

Rajsthan ACB arrest Mumbai Police : लाच घेणाऱ्या दोन मुंबई पोलिसांना राजस्थानच्या एसबीकडून अटक ; लाचेचे 4.97 लाख जप्त

एसीबीचे पथक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी आणि फसवणुकीत अडकलेल्या आरोपींची चौकशी ( Udaypur ACB probe of police bribe  ) करत होते. एसीबीचे अतिरिक्त एसपी उमेश ओझा यांनी सांगितले की, शनिवारी एसीबीच्या स्पेशल युनिट टीमला अशी माहिती मिळाली की, उदयपूर येथील एका व्यक्तीविरुद्ध पोलीस स्टेशन अनोला जिल्हा ( Anola police station bribe ) पालघर महाराष्ट्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांना राजस्थानच्या एसबीकडून अटक

author img

By

Published : Apr 23, 2022, 10:47 PM IST

उदयपूर- राजस्थानच्या एसीबीच्या ( Rajasthan ACB arrest Mumbai Police ) पथकाने शनिवारी मोठी कारवाई केली. गुन्हेगाराला अटक न करण्याच्या बदल्यात लाच घेताना एसीबीने मुंबई गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना ( Mumbai police arrest in Udaypur ) अटक केली आहे. एसीबीच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आणि मुंबई गुन्हे शाखेचे हेडकॉन्स्टेबल प्रशांत यांना ४.९७ लाख रुपयांसह अटक केली आहे.

एसीबीचे पथक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी आणि फसवणुकीत अडकलेल्या आरोपींची चौकशी ( Udaypur ACB probe of police bribe ) करत होते. एसीबीचे अतिरिक्त एसपी उमेश ओझा यांनी सांगितले की, शनिवारी एसीबीच्या स्पेशल युनिट टीमला अशी माहिती मिळाली की, उदयपूर येथील एका व्यक्तीविरुद्ध पोलीस स्टेशन अनोला जिल्हा ( Anola police station bribe ) पालघर महाराष्ट्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक न करण्यासाठी गुन्हे शाखेचे ज्ञानेश्वर आणि प्रशांत पाटील यांनी त्याच्याकडून लाचेचे ४ लाख ९७ हजार रुपये घेतले. ते खासगी कारने मुंबईच्या दिशेने जात होते. तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.

मुंबई पोलिसांना राजस्थानच्या एसबीकडून अटक

पोलिसांना रकमेबाबत माहिती देता आली नाही-माहिती मिळताच राजस्थानच्या एसीबीच्या पथकाने गुन्हे शाखेच्या या पोलीस कर्मचाऱ्यांना पकडण्याची योजना आखली. एसीबी उदयपूरचे उपमहानिरीक्षक राजेंद्र प्रसाद गोयल आणि पोलिस अधीक्षक राजीव पाचर यांच्या देखरेखीखाली, उदयपूर युनिटचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक उमेश ओझा यांच्या नेतृत्वाखाली एसीबी स्पेशल युनिटने शहरातील चेतक सर्कल येथे एक कार अडवली. तपासणी केली असता त्यामध्ये 4.97 लाख रुपयांची अवैध रक्कम जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या रकमेबाबत एसीबीला ज्ञानेश्वर आणि प्रशांत पाटील यांच्याकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाले नाही. त्यानंतर एसीबीने दोघांनाही अटक केली.

हेही वाचा-धार्मिक तेढ निर्माण करणारा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या यूट्यूबच्या अँकरसह संपादकाला अटक

हेही वाचा-चोरीच्या संशयावरून वॉचमनचा खून; 7 आरोपींना पोलीस कोठडी

हेही वाचा-Moon Land Cheating : चंद्रावर जमीन घेणाऱ्या विकासकासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.