ETV Bharat / bharat

पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कर्ता, धनराज पिल्लेंसंबंधीत ईटीव्ही भारतच्या काही आठवणी - rajiv gandhi khel ratna award

केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. आता या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन केली. दरम्यान, 1991 मध्ये सुरू झालेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (Rajiv Gandhi Khel Ratna) प्रथम ऑलिम्पिक गाजवलेले दिग्गज हॉकी खेळाडू धनराज पिल्ले (Dhanraj Pillay) यांना मिळाला होता.

dhanraj pillay
dhanraj pillay
author img

By

Published : Aug 6, 2021, 10:18 PM IST

हैदराबाद : हॉकी खेळाडू धनराज पिल्ले 2002 मध्ये ईटीव्हीशी बोलताना म्हणाले होते, की 'हॉकीसाठी परदेशी प्रशिक्षक असण्याच्या कल्पनेशी आपण सहमत नाही. जोकिम कार्वाल्होंसारख्या प्रशिक्षकांसह मी स्वतः चार वेळा खेळांच्या महाकुंभात म्हणजे ऑलिम्पिक खेळ खेळण्यासाठी गेलो होतो'.

धनराज पिल्ले

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय हॉकीच्या यशासाठी धनराज पिल्ले म्हणाले होते, की 'आम्हाला मोठी स्पर्धा जिंकायची आहे. भारताच्या हॉकीच्या उन्नतीसाठी ऑलिम्पिक आणि विश्वचषक यासारख्या स्पर्धा जिंकण्याची नितांत गरज आहे'.

वाचा.. कुणी केली होती राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याची मागणी

ईटीव्ही भारत तुमच्यासोबत धनराज पिल्ले यांच्यासंबंधित काही खास आठवणी शेअर करत आहे...

1991 मध्ये राजीव गांधी खेलरत्नची सुरूवात

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्याची सुरुवात 1991 मध्ये झाली. एका खेळाडूच्या वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिला जातो.

धनराज पिल्ले

हॉकीत पहिला राजीव गांधी खेलरत्न कोणाला?

आतापर्यंत फक्त तीन हॉकी खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. यापैकी, ज्येष्ठ हॉकीपटू धनराज पिल्ले, ज्यांनी 1999-2000 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांना प्रथम राजीव गांधी खेल रत्न देण्यात आला होता.

लवकरच मोटेरासारखे हॉकी स्टेडियम बांधले जाईल- पिल्ले

फेब्रुवारी 2021 मध्ये गुजरातमधील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने धनराज पिल्ले यांच्याशी खास बातचीत केली. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी आशिष पांचाळ यांच्याशी बोलताना धनराज पिल्ले म्हणाले होते, की 'लवकरच यासारखे हॉकी स्टेडियम बांधले जाईल. राजकोटमध्ये एक स्टेडियम आहे. एक बारडोडा आणि एक देवगडमध्ये आहे'. दरम्यान, गुजरातमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडीयम असे ठेवण्यात आले आहे. हे स्टेडियम 63 एकर जागेवर पसरले असून त्यास तयार करण्यास 800 कोटी रुपये लागले आहेत. सुमारे 1 लाख 32 हजार प्रेक्षकांना सामावून घेईल, येवढे मोठे स्टेडियम आहे. ऑस्ट्रेलियातील 90 हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या मेलबर्न स्टेडियमला नरेंद्र मोदी स्टेडियमने मागे टाकले आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियमचा मान यास मिळाला आहे.

धनराज म्हणाले होते, की 'देशातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी सरकार सर्व आवश्यक प्रयत्न करत आहे. मला वाटते की या प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे खेळाडूंना वाढण्यास मदत होईल'.

धनराज पिल्लेंशी साधलेला संवाद

एका क्रीडा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गुजरातमध्ये आलेल्या धनराज पिल्ले यांच्याशी ईटीव्ही भारतने खास संभाषण केले होते. 'भारतातील क्रीडा क्षेत्रात सुविधा वाढत आहेत. त्यामुळे हॉकीचे भविष्य खूप उज्ज्वल आहे', असे यावेळी पिल्ले म्हणाले होते.

आणखी एका प्रसंगी धनराज पिल्ले यांनी श्रीलंकेतील भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवानंतर दुःख व्यक्त केले. ते म्हणाले होते, की 'खेळाडूंनी अनुमोदन केले पाहिजे. परंतु ते जास्त करणे चुकीचे आहे'.

गांगुलीशी तुलना करण्यास पिल्लेंचा नकार

क्रिकेट आणि हॉकीच्या तुलनेवर धनराज पिल्ले म्हणाले होते, की 'दोन्ही खेळांनी देशाला अभिमानाचे क्षण दिले आहेत'. दरम्यान, त्यांनी तत्कालीन क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली आणि स्वतःशी तुलना करण्यासही नकार दिला होता.

हॉकी प्रशिक्षकाबाबत पिल्लेंचे मत

हॉकीच्या उत्तमतेसाठी धनराज पिल्ले म्हणाले होते, की कोणत्याही प्रशिक्षकाला संघासोबत किमान तीन वर्षांचा वेळ दिला पाहिजे.

सरदार सिंग यांना खेलरत्न

2000 नंतर हॉकीपटूंना खेलरत्नसाठी बराच काळ वाट पाहावी लागली. 2017 मध्ये सरदार सिंग यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. सरदार यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती.

राणी रामपालला राजीव गांधी खेलरत्न

गेल्या वर्षी म्हणजेच 2020 साठी महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालची राजीव गांधी खेल रत्नसाठी निवड झाली. राणी रामपालने 200 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळले आहेत. तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत. 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत राणी रामपालने उल्लेखनीय कामगिरी केली. यानंतर राणी आशियाई हॉकी महासंघाच्या ऑल स्टार संघात सामील झाली. २०२० मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळेपर्यंत 240 सामने खेळणाऱ्या राणीने 118 गोल केले आहेत. तिच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षी एफआयएच मालिकेची अंतिम लढत जिंकली.

हेही वाचा - राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्याने काँग्रेस नेत्यांची पंतप्रधान मोदींवर टीका

हेही वाचा - राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसचे निदर्शने

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.