भिलवाडा : Rajasthan Roti : राजस्थानच्या भिलवाडा इथं तब्बल १७१ किलो वजनाची रोटी बनवण्यात आलीय. 21 हलवायांच्या टीमनं तयार केलेल्या या रोटीसाठी 180 किलो ओलं पीठ वापरलं गेलंय. याशिवाय रोटी बनवण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्हिडिओग्राफीही करण्यात आली. आता ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवले जाणार आहे. तसंच याविषयी इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्येही अर्ज करण्यात आलाय.
वाढदिवसानिमित्त अनोखा प्रयोग : भाजपाचे जिल्हा प्रवक्ते आणि राजस्थानी जनमंचचे जिल्हाध्यक्ष कैलाश सोनी यांनी वाढदिवसानिमित्त ही रोटी बनवण्याचा अनोखा प्रयोग करण्यात आलाय. वाढदिवसानिमित्त हरीसेवा उदासीन आश्रमात ही महारोती तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. साडेपाच तासांच्या अथक परिश्रमानंतर तयार करण्यात आलेली ही महारोटी हरिसेवा उदासीन आश्रमाला भेट देणाऱ्या भाविक आणि प्रेक्षकांमध्ये पंचकुटा भाजीसह प्रसाद म्हणून वाटण्यात आली.
मोठ्या रोट्यासाठी मोठा प्लॅन : यासंदर्भात कैलास सोनी यांनी सांगितलंय की, इतकी मोठी रोटी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आलं होतं. ही रोटी बनवण्यासाठी सुमारे 2000 मातीच्या विटांचा मातीचा लेप करून भट्टी तयार करण्यात आली. तसंच 1000 किलो कोळसा वापरण्यात आला. ही रोटी तयार करण्यासाठी मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील 21 हलवायांच्या टीममध्ये सहभाग होता. महारोटी तयार करण्यासाठी सकाळी दहा वाजता पीठ मळण्याचं काम सुरू झालं. त्याचवेळी रोटी तयार व्हायला दुपारी ३.३० वाजले. या महारोटीसाठी 180 किलो पीठ वापरण्यात आलंय. तसंच 20 फूट स्टीलच्या खांबानं लाटण्यात आलंय. विशेष म्हणजे ही रोटी वरून भाजण्यासाठी रोटीच्या वर तवाही ठेवला होता.
कोणतं साहित्य वापरलं : ही रोटी बनवणारे कारागीर अमरचंद सुथार म्हणाले की, हरी सेवा आश्रम भिलवाडा इथं 180 किलो ओल्या पिठाच्या रोट्या बनवल्या गेल्या. रोटी तयार झाल्यानंतर त्याचं वजन 171 किलो होतं. ही रोटी तयार करण्यासाठी आम्ही 110 किलो गव्हाचं पीठ, 10 किलो मैदा आणि 10 किलो देशी तूप मिसळलं. यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ तयार केलं. ही रोटी बनवण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून तयारी सुरू होती. ही रोटी तयार झाल्यानंतर पंचकुटा भाजीसह प्रसाद म्हणून लोकांमध्ये वाटण्यात आल्याचं अमरचंद यांनी सांगितलंय.
संतांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु : भिलवाडा इथं संत समाजही या महाआरतीच्या तयारीचा साक्षीदार ठरलाय. संतांनी प्रथम भूमिपूजन केले आणि त्यानंतर वैदिक मंत्रोच्चारांनी पूजा करताना भट्टीत अग्नी पेटवला. या कार्यक्रमाचं लाईव्ह रेकॉर्डिंगही करण्यात आलंय. हा विश्वविक्रम करण्यासाठी लिम्का बुक, इंटरनॅशनल बुक रेकॉर्डकडं अर्ज करण्यात आलेत. तसंच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवलं जाईल.
जुना विश्वविक्रम मोडण्याचा प्रयत्न : जुना विश्वविक्रम मोडण्याचा ही महारोटी करण्यामागचा हेतू असल्याचं कैलास सोनी यांनी सांगितलंय. या रोटीचा व्यास 11x11 फूट होता, तर जाडी सुमारे 70 मिमी होती. ते बनवण्यासाठी विशेष प्रकारची लोखंडी कढई तयार करण्यात आली, ज्याची लांबी आणि रुंदी 16 फूट x 12 फूट आणि वजन 1000 किलो आहे. ही रोटी तयार करण्यासाठी एका खास कारागिराला पाचारण करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. कैलास सोनी म्हणाले की, माझ्या वाढदिवसाला मोठी रोटी बनवण्यात आली होती. ते म्हणाले की, सध्याची पिढी वाढदिवसाला केक कापते, पण जुनी संस्कृती विसरली आहे. म्हणूनच मी एक आगळावेगळा प्रयोग केलाय.
सर्वात मोठ्या रोटीचा विक्रम कोणता : याआधी गुजरातमधील जामनगरमध्ये जवळपास 145 किलो वजनाची रोटी बनवण्याचा विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. यानंतर आता भिलवाडामध्ये १७१ किलो रोटी बनवण्यात आलीय. या महारोटीच्या तयारीवेळी लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. रोटी भाजताना पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती.
हेही वाचा :
- Rajasthan Accident : राजस्थानात बस आणि कारची भीषण धडक, ७ जणांचा जागीच मृत्यू
- Fire in hospital basement : रुग्णालयाला लागली भीषण आग; अग्नीशमन दलाच्या प्रयत्नाने १०० रुग्णांचे वाचले प्राण
- Sachin Pilot On Amit Malviya : भाजपा आयटी सेलप्रमुख अमित मालवीय यांना सचिन पायलट यांनी पाडले खोटे, वाचा काय दिला पुरावा...