जयपूर - महाराष्ट्र व केरळ राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने राजस्थान राज्याने धसका घेतला आहे. राजस्थानने महाराष्ट्र व केरळमधून येणाऱ्या नागरिकांनाआरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. जर ही चाचणी निगेटिव्ह असेल तरच त्या नागरिकाला राजस्थानात प्रवेश दिला जाणार आहे. हा निर्णय मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे.
कोरोनाविरोधातील लसीकरणाच्या जनजागृतीसाठी मार्चपासून मोहिम राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या काळात सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा-मुंबईत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता; पालिका २४ नवीन कोरोना सेंटर सुरू करणार
पुढे गेहलोत म्हणाले की कोरोनाच्या नियमांचे पालन करातना कोणताही निष्काळजीपणा चालणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. कोरोनाविरोधातील लशीची भीती बाळगण्याचे कारण नाही. लस घेण्याचा क्रमांक आलेल्या नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी, असे गेहलोत यांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा-'इंधन दरवाढ आणि रस्ते विकासाच्या नावाखाली केंद्र सरकारकडून जनतेची लूट'
कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्यानेही दिल्लीमध्ये दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीमध्ये महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश व पंजाबमधून येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्र व केरळमधून दिल्लीत येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे.