ETV Bharat / bharat

Fake Call Centre Busted: बेकायदेशीर कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, ३२ तरुण-तरुणींना अटक, अमेरिकन नागरिकांची करत होते फसवणूक - परदेशी नागरिक फसवणूक ३२ अटकेत

जयपूर पोलिस आयुक्तालयाच्या सीएसटी पथकाने बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 32 तरुण-तरुणींना अटक केली.

RAJASTHAN: Fake call centre busted in Jaipur, 32 arrested for defrauding foreigners
बेकायदेशीर कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, ३२ तरुण- तरुणींना अटक, अमेरिकन नागरिकांची करत होते फसवणूक
author img

By

Published : Apr 20, 2023, 7:33 PM IST

जयपूर (राजस्थान) : राजस्थानच्या जयपूर पोलीस आयुक्तालयाच्या सीएसटी पथकाने चित्रकूट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर कॉल सेंटरवर छापे टाकले आहेत. या कारवाईत पोलिसांनी 32 तरुण-तरुणींना अटक केली आहे. कारवाईदरम्यान, हे लोक खात्याची माहिती घेत होते आणि कॉल करून सिस्टीम हॅक करण्याच्या बहाण्याने अमेरिकेत बसलेल्या लोकांची फसवणूक करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पकडलेले तरुण-तरुणी नागालँड, मेघालय, मणिपूर आणि पश्चिम बंगालमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे कैलाशचंद्र बिश्नोई यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

परराज्यातील आरोपी : अतिरिक्त पोलिस आयुक्त कैलाश चंद्र बिश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर पोलिस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने चित्रकूट पोलिस स्टेशन परिसरात छापा टाकून अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. या परिसरात बेकायदेशीरपणे कॉल सेंटर सुरू असल्याच्या माहितीवरून जानकी टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर छापा टाकण्यात आला. अवैधरित्या सुरू असलेल्या कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी 32 तरुण-तरुणींना अटक केली आहे. पोलिसांनी पकडलेले आरोपी नागालँड, मेघालय, मणिपूर आणि पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत.

परदेशी नागरिकांना धमकावून बँकेचे तपशील घेतले : अतिरिक्त पोलीस आयुक्त कैलाश चंद बिश्नोई यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की जयपूरमध्ये बसून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते. USA मध्ये बसलेल्या लोकांना फोन करून तुमची सिस्टीम हॅक झाल्याचे सांगायचे. हॅकर्स तुमच्या आयडीवरून पॉर्न व्हिडिओ अपलोड करू शकतात. अशाप्रकारे परदेशी नागरिकांना धमकावून बँक खात्याची माहिती घेऊन परदेशी नागरिकांची फसवणूक करत असत.

चौकशी झाली सुरू : अतिरिक्त पोलिस आयुक्त गुन्हे कैलाश चंद्र बिश्नोई यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे. या टोळीत कोण-कोण सामील आहेत, याची चौकशी करून टोळीची माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकार कधीपासून सुरू होता, त्यांनी किती जणांसोबत गुन्हे केले.

अनेक बाबी केल्या जप्त : चित्रकूट पोलिस स्टेशनचे अधिकारी गुंजन सोनी यांनी सांगितले की, जयपूरमधील सीआयडी इंटेलिजन्सच्या माहितीवरून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या 32 तरुणांची पोलीस चौकशी करत आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात संगणक, यंत्रणा, लॅपटॉप आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा: नरोडा दंगल प्रकरणी आरोपी निर्दोष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.