ETV Bharat / bharat

राजस्थानात वसुंधराच 'राजे'; पारंपरिक झालरापाटन मतदारसंघातून दणदणीत विजय

Rajasthan Assembly Elections Result 2023 : राजस्थानात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झालीय. काही वेळातच चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यातील 199 विधानसभा जागांवर काही वेळातच चित्र स्पष्ट होणार आहे.

Rajasthan Assembly Elections Result 2023

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 11:26 AM IST

Updated : Dec 3, 2023, 12:54 PM IST

जयपूर Rajasthan Assembly Elections Result 2023 : राजस्थानातील 199 जागांपैकी निवडणूक आयोगानं आतापर्यंत 199 जागांची मतमोजणी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात भाजपाकडे 111 जागांची आघाडी आहे. तर काँग्रेस 71 जागांवर आघाडीवर आहे. तसंच मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला 3 जागांची, भारत आदिवासी पक्षाला 2 जागांची तर माकपला एका जागेची आघाडी मिळाली आहे. त्याचवेळी इतर पक्ष आठ जागांवर पुढे आहेत.

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे विजयी : झालरापाटन मतदारसंघातून भाजपाच्या फायरब्रँड नेत्या तथा माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपला दबदबा कायम ठेवत तब्बल 48 हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवलाय.

तीन राज्यांत भाजपाचं सरकार येईल : केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी भारतीय जनता पक्ष बहुमताने विजयी होईल, असा दावा केलाय. आता जादूगाराची जादू संपली आहे. राजस्थानच्या जनतेला अनेक प्रकारची फसवणूक करण्यात आली. मात्र राजस्थानची जनता स्वाभिमानी असल्याचं त्यांनी म्हटलंय. जनता खोट्या आश्वासनांना बळी पडत नाही. इतकंच नाही तर छत्तीसगडमध्येही भाजपाचं सरकार स्थापन होणार असल्याचा दावा गजेंद्र सिंह शेखावत यांनी केलाय.

दिग्गज आघाडीवर : जोधपूरमधील सरदारपुरा येथून मुख्यमंत्री अशोक गेहलोत 8043 मतांनी पुढे आहेत. तर उपमुख्यमंत्री सचिन पायलट टोंक विधानसभा मतदारसंघातून आठव्या फेरीपर्यंत 690 मतांनी पुढे आहेत.

(सविस्तर माहिती थोड्याच वेळात)

Last Updated : Dec 3, 2023, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.