ETV Bharat / bharat

Ashok Gehlot And Sachin Pilot : अशोक गेहलोत, सचिन पायलटचे 'हम साथ साथ है' चित्र चौथ्यांदा समोर, मात्र भविष्यावर सस्पेंस कायम - अशोक गेहलोत

सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांचे सोबत असलेले फोटो आज समोरआले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून शीतयुद्ध सुरू आहे.

Ashok Gehlot And Sachin Pilot
सचिन पायलट आणि अशोक गेहलोत सोबत
author img

By

Published : May 30, 2023, 11:50 AM IST

Updated : May 30, 2023, 1:14 PM IST

जयपूर : राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील शितयुद्ध पुन्हा एकदा शांत करण्यात वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रयत्नामुळे हे दोन्ही नेते एकत्र आल्याचे बोलले जात आहे. मात्र यापूर्वी तीन वेळा सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील वाद काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मिटवला होता. तरीही या दोन्ही नेत्यांनी आपला वाद सुरूच सुरुच ठेवला होता. आता पुन्हा सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोन्ही नेत्यांमध्ये हातमिळवणी झाली असली, तरी ही हातमिळवणी किती दिवस राहणार याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे.

  • #WATCH | If he (Sachin Pilot) is in the party then why won't he do this (work together). The position is not important for me, I have been the CM thrice. Today it's my duty to do the work that the high command wants which is to win the election: Rajasthan CM Ashok Gehlot pic.twitter.com/hxtLs3V3Kc

    — ANI (@ANI) May 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तीन वेळेस झाला समझौता : राजस्थानमध्ये डिसेंबर 2018 मध्ये सरकार स्थापनेपासून दोन्ही नेत्यांमधील राजकीय भांडण सुरू झाले. डिसेंबर 2018 मध्ये जेव्हा गेहलोत यांनी मुख्यमंत्री होण्याच्या बाबतीत सचिन पायलटचा पराभव केला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांमधील दरी कमी करण्यासाठी राहुल गांधींसह गेहलोत आणि पायलट यांची हसतमुख छायाचित्रे समोर आली. पण ही छायाचित्रे केवळ दिखाव्यासाठीच राहिली आणि 2 वर्षातच सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्याविरोधात बंड केले.

Ashok Gehlot And Sachin Pilot
हातमिळवणी करताना सचिन पायलट आणि अशोक गेहलोत

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला आव्हान : सचिन पायलट यांनी जुलै 2020 मध्ये त्यांच्या समर्थकांसह मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाला आव्हान देत दिल्लीला गेले. सुमारे 35 दिवस चाललेल्या गदारोळानंतर ऑगस्ट 2020 मध्ये प्रियंका गांधी आणि अहमद पटेल यांनी सचिन पायलट यांना काँग्रेसमध्ये परत आणण्यासाठी हस्तक्षेप केला. यानंतर ऑगस्ट 2020 मध्येच मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि केसी वेणुगोपाल यांची एकजूट दाखवणारी छायाचित्रे समोर आली. मात्र त्यानंतरही दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय शीतयुद्ध सुरूच होते.

Ashok Gehlot And Sachin Pilot
राहुल गांधी यांच्या समवेत दोन्ही नेते

दोन्ही नेत्यांमधील अंतर गेले वाढत : काँग्रेस हायकमांडने सप्टेंबर 2022 मध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली, तेव्हा काँग्रेस आमदारांनी त्यावर बहिष्कार टाकला. विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्याकडे काँग्रेस नेत्यांनी आपले राजीनामे सुपूर्द केले. त्यामुळे सचिन पायलट विरुद्ध अशोक गेहलोत शीतयुद्ध शिगेला पोहोचले. दरम्यान, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा डिसेंबर 2022 मध्ये राजस्थानमध्ये दाखल होणार होती. त्याआधी नोव्हेंबर 2022 मध्ये संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल पुन्हा राजस्थानमध्ये आले. त्यांनी दोन्ही नेत्यांशी चर्चा केल्यामुळे दोन्ही नेते एकत्र फिरताना दिसले. त्यानंतर भारत जोडो यात्रेत दोन्ही नेते राहुल गांधींच्या बरोबरीने चालताना दिसले, तरी गेहलोत आणि पायलट यांच्यातील अंतर वाढतच गेले.

Ashok Gehlot And Sachin Pilot
राहुल गांधी यांच्या समवेत दोन्ही नेते

हेही वाचा -

Ashok Gehlol on PM Modi: धार्मिक वक्तव्ये केल्याने पंतप्रधान मोदींच्या सभेवर बंदी घालावी- अशोक गेहलोत यांची मागणी

Ashok Gehlot Budget : अन् राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत वाचला जुनाच अर्थसंकल्प! गदारोळानंतर कामकाज तहकूब

Last Updated : May 30, 2023, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.