ETV Bharat / bharat

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थानमध्ये निवडणुकीची तारीख बदलली;आता 25 नोव्हेंबरला होणार मतदान - राजस्थानमध्ये निवडणुकीची तारीख बदलली

Rajasthan Assembly Election 2023 : निवडणूक आयोगाने राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. राजस्थानमध्ये आता 25 नोव्हेंबरला मतदान होणार (Voting Will be On 25 November) आहे. निवडणूक आयोगाने केवळ मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. याशिवाय नामनिर्देशन सुरू करणे आणि नामांकन मागे घेणे, मतमोजणी यासह सर्व वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आलं आहे.

Rajasthan Assembly Election 2023
राजस्थान विधानसभा निवडणूक 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 6:56 PM IST

जयपूर Rajasthan Assembly Election 2023 : निवडणूक आयोगाने राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत. राजस्थानमध्ये आता 25 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान (Voting Will be On 25 November) होणार आहे. तसंच, पूर्वी ठरल्याप्रमाणे ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मतदानाची तारीख बदलण्यामागील मुख्य कारण म्हणजे निवडणुकीची तारीख आणि एकादशी (Devotthan Ekadashi) एकाच दिवशी येत आहे.

25 नोव्हेंबरला होणार मतदान : निवडणूक आयोगाने राजस्थान विधानसभा निवडणुकीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत निवडणूक आयोगाचे सचिव संजीव कुमार प्रसाद यांनी सुधारित वेळापत्रकात सांगितले आहे की, राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीसाठी आता 23 ऐवजी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर इतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी 3 डिसेंबर रोजी नियोजित वेळेनुसार मतमोजणी होणार आहे. तसंच मतदान पॅनलने सोमवारी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

देशभर साजरी होते देवूठाणी एकादशी : देवूठाणी एकादशी मतदानाच्या दिवशी आल्याने बदल करण्यात आलाय. राजस्थानमध्ये संस्कृती आणि धार्मिक श्रद्धेशी संबंधित एक मोठा सण म्हणजे देवूठाणी एकादशी असते. तशी ही एकादशी देशभर साजरा केली जाते. परंतु राजस्थानमध्ये त्याचा मोठा प्रभाव आहे. राजस्थानमध्ये या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह होतात. लग्नसोहळ्यांमुळे लोक एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात. त्याचवेळी, मंडप, खानपान, बँड आदींसह इतर अनेक लोक विवाहसोहळ्यांमध्ये सामील होतात. अशा परिस्थितीत हे लोक या दिवशी मतदानासाठी जाऊ शकत नाहीत. याबाबत अनेक सामाजिक संस्थांनी पत्रेही दिली होती. त्यानंतर मतदानाची तारीख बदलून दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Assembly Elections 2023 Dates : पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं, कोणत्या राज्यात कधी मतदान, वाचा सविस्तर
  2. Om Mathur: थेट पंतप्रधान मोदींनाच 'या' नेत्याने केलं चॅलेंज.. म्हणे, 'माझ्या माणसाचं तिकीट मोदीही कापू शकत नाहीत..'
  3. Indira Ekadashi 2023 : पितृ पक्षात कधी साजरी होणार इंदिरा एकादशी, जाणून घ्या या एकादशीचे महत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.