ETV Bharat / bharat

"वीर तुम बढ़े चलो, अन्नदाता तुम बढ़े चलो", राहुल गांधींचा कवितेतून मोदींवर हल्लाबोल - राहुल गांधी लेटेस्ट न्यूज

काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी आज कवितेतून मोदींवर जोरदार निशाणा साधाला. राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये काही फोटोही शेअर केली आहेत. आंदोलक शेतकऱ्यांवर होणारे लाठीहल्ले, पाण्याच्या फवाऱ्याचा मारा, पोलिसांकडून शेतकऱ्यांना झालेल्या जखमा आणि कडाक्या थंडीतील शेतकऱ्यांचे आंदोलन हे राहुल गांधी यांनी फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधींचा कवितेतून मोदींवर हल्लाबोल

author img

By

Published : Dec 27, 2020, 4:06 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला असून अद्याप त्यावर काही तोडगा काढण्यात आला नाही. काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी आज कवितेतून मोदींवर जोरदार निशाणा साधाला.

राहुल गांधींचा कवितेतून मोदींवर हल्लाबोल
राहुल गांधींचा कवितेतून मोदींवर हल्लाबोल

राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये काही फोटोही शेअर केली आहेत. आंदोलक शेतकऱ्यांवर होणारे लाठीहल्ले, पाण्याच्या फवाऱ्याचा मारा, पोलिसांकडून शेतकऱ्यांना झालेल्या जखमा आणि कडाक्या थंडीतील शेतकऱ्यांचे आंदोलन हे राहुल गांधी यांनी फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना वीरांची उपमा दिली आहे. शेतकरी हे देशाचे अन्नदाते असून त्यांनी कोणालाही न घाबरता, पुढे चालत राहाव, असं राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी लिहलेल्या कवितेत म्हटलं आहे. जरी पाण्याचा-लाठ्याचा मारा झाला, तरी न घाबरता पुढे चालत राहवं, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल यांची कविता...

वीर तुम बढ़े चलो

धीर तुम बढ़े चलो

वॉटर गन की बौछार हो

या गीदड़ भभकी हज़ार हो

तुम निडर डरो नहीं

तुम निडर डटो वहीं

वीर तुम बढ़े चलो

अन्नदाता तुम बढ़े चलो!

शेतकरी आंदोलन -

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने तीन नव्या कृषी कायद्यांना मंजुरी दिली आहे. मात्र, या कायद्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या कायद्यांविरोधात गेल्या 30 दिवसांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत आंदोलन सुरू आहे. हे कायदे तातडीने रद्द करावेत अशी मागणी हे शेतकरी करत आहेत, मात्र गेल्या 30 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या या शेतकऱ्यांची अद्यापही सरकारने दखल घेतलेली नाही. विरोधकांकडून नव्या कृषी कायद्यांबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. कृषी कायद्यावर सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार आहे. अशी भूमिका केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनावर घेतली आहे.

हेही वाचा - हरियाणामध्ये टोल प्लाजा कायमस्वरूपी विनामूल्य - बीकेयू प्रदेश अध्यक्ष गुरनाम सिंह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.