ETV Bharat / bharat

इंधन दरवाढीवरून निशाणा साधणाऱ्या राहुल गांधींचा दुचाकीने पणजीत प्रवास - राहुल गांधी पणजी भेट

राहुल गांधी हे पणजीत ते बंबोलिमवरून आझाद मैदानात पोहोचले. हा प्रवास त्यांनी मोटारसायकल टॅक्सी पायलटने केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत असतात.

राहुल गांधी दुचाकी प्रवास
राहुल गांधी दुचाकी प्रवास
author img

By

Published : Oct 30, 2021, 4:42 PM IST

Updated : Oct 30, 2021, 5:08 PM IST

हैदराबाद- गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. अशातच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे पणजीमध्ये दुचाकीने प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ राहुल यांनी त्यांच्या ट्विटरवरून शेअर केला आहे.

राहुल गांधी हे गोवाच्या दौऱ्यावर आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांचा हा दौरा आहे. शनिवारी त्यांनी दुपारी एका गावाजवळ दुपारी जेवण घेतले. त्यानंतर त्यांनी मोटारसायकल टॅक्सीने सुमारे 5 किलोमीटर प्रवास केला आहे.

राहुल गांधींचा दुचाकीने पणजीत प्रवास

हेही वाचा-तृणमूलची प्रादेशिक पक्षाशी पडद्याआड; चर्चा राज्यातील बडे नेते ममतांच्या भेटीला

दुपारी मच्छिमारांशी साधला संवाद

राहुल गांधी हे शनिवारी सकाळी गोव्यात पोहोचले आहे. त्यांनी दक्षिण गोव्यामध्ये मच्छिमारांशी संवाद साधला. तर बांबोलीन गावानजीक पणजी-मार्गाव महामार्गावर दुपारी जेवण घेतले. यावेळी त्यांच्यासोबत गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चांदोकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत उपस्थित होते.

राहुल गांधींचा दुचाकीने पणजीत प्रवास
राहुल गांधींचा दुचाकीने पणजीत प्रवास

हेही वाचा-देशात 30 विधानसभा आणि 3 लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु; 2 नोव्हेंबरला निकाल

सायंकाळी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

गांधी यांनी रिसॉर्टपर्यंत पोहोचण्यासाठी मोटारसायकल पायलटची लिफ्ट घेतली. ही मोटारसायकल दुचाकी टॅक्सी म्हणून ओळखली जाते. राहुल गांधी हे शनिवारी सायंकाळी पणजीमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधन करणार आहेत.

कार्यकर्त्यांसमवेत राहुल यांनी केले जेवण

हेही वाचा-गोव्यात तृणमूलकडून तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू, प्रादेशिक नेते ममता बॅनर्जींच्या भेटीला

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत असतात.

Last Updated : Oct 30, 2021, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.