ETV Bharat / bharat

Indian students stuck in Ukraine : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण, राहुल गांधींचे टि्वट - Mission Ganga

युक्रेनमधून शेजारी देशांमध्ये जाताना भारतीयांसोबत दुजाभाव ( Indians being beaten in Ukraine ) होत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. युक्रेनमधील विध्वसंक परिस्थितीचे फोटोज आणि व्हिडिओ समोर येत आहेत. यातच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थांना मारहाण होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असाच एक व्हिडिओ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ( Rahul Gandhi Shares Video Of Indian Students ) टि्वट केला आहे.

Russia Ukraine Conflict
Indian students stuck in Ukraine
author img

By

Published : Feb 28, 2022, 12:22 PM IST

नवी दिल्ली - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं असून आज या युद्धाचा पाचवा दिवस आहे. युद्धाच्या छायेतील युक्रेनमधून अनेक लोक शेजारी देशांचा आसरा घेत सुरक्षित ठिकाणाचा शोध घेत आहेत. यात भारतीयांचाही समावेश आहे. मात्र, युक्रेनमधून शेजारी देशांमध्ये जाताना भारतीयांसोबत दुजाभाव ( Indians being beaten in Ukraine ) होत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत. युक्रेनमधील विध्वसंक परिस्थितीचे फोटोज आणि व्हिडिओ समोर येत आहेत. यातच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थांना मारहाण होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असाच एक व्हिडिओ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ( Rahul Gandhi Shares Video Of Indian Students ) टि्वट केला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करावी, असे आवाहन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्राला केले आहे.

  • My heart goes out to the Indian students suffering such violence and their family watching these videos. No parent should go through this.

    GOI must urgently share the detailed evacuation plan with those stranded as well as their families.

    We can’t abandon our own people. pic.twitter.com/MVzOPWIm8D

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल यांनी टि्वटमध्ये म्हटलं, की युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांसोबत तसेच त्यांच्या कुटुंबीयांना भारत सरकारने ताबडतोब तपशिलवार निर्वासन योजनेची माहिती द्यावी. संकटग्रस्त देशात आपण आपल्या प्रियजनांना सोडू शकत नाही. याआधी, राहुल गांधींनी कर्नाटकातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये एका बंकरमध्ये अडकलेले दिसत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. बंकरमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थ्यांचे हे दृश्य अस्वस्थ करणारे आहे. अनेक विद्यार्थी पूर्व युक्रेनमध्ये अडकले आहेत, असे ते म्हणाले होते.

  • Visuals of Indian students in bunkers are disturbing. Many are stuck in eastern Ukraine which is under heavy attack.

    My thoughts are with their worried family members. Again, I appeal to GOI to execute urgent evacuation. pic.twitter.com/alem9nYNgr

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) February 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थ्यांना नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पोलंडच्या सीमेवर तैनात असलेल्या काही युक्रेनियन सैनिकांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या एका गटाला मारहाण केल्याचा आणि धमकावल्याची माहिती आहे. भारत सरकार युक्रेनला पाठिंबा देत नाही. मग आम्ही तुम्हाला सहकार्य का करू, असे युक्रेनच्या सैन्यांनी विद्यार्थ्यांना म्हटल्यांची माहिती आहे.

युक्रेनमध्ये भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी अधिकृत ट्विटर हँडल 'ओपगंगा हेल्पलाइन' सुरू केली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या ऑपरेशनला 'ऑपरेशन गंगा' असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गतच काल युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांना सुखरुप भारतात आणण्यात आले होते.

चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाणार -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. काही केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाऊन निर्वासन मोहिमेत भूमिका बजावू शकतात, असे सुचवले होते. निर्वासन मोहिमेत समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे भारताचे विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार आहेत. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा - EXPLAINER : भारतावर रशिया युक्रेन वादाचा काय होणार परिणाम? जाणून घ्या या व्हीडीयोतून....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.