ETV Bharat / bharat

Rahul Gandhi on Economy : श्रीलंकेप्रमाणे भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका - राहुल गांधी भारत अर्थव्यवस्था टीका

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी( Sri Lanka Crisis Rahul Gandhi ) ट्विट करत भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून मोदी सरकावर ( Rahul Gandhi on Indian economy ) टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की लोकांचे लक्ष वळवल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. भारत श्रीलंकेसारखा दिसतो. त्यांनी ट्विटमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून श्रीलंकेबरोर असलेल्या तीन गोष्टींची तुलना केली आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : May 18, 2022, 10:43 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारताची तुलना ( India compare to Sri Lanka ) श्रीलंकेशी केली आहे. बुधवारी त्यांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर ( Congress slammed Modi gov ) निशाणा साधला. भारताची स्थिती श्रीलंकेसारखी दिसत आहे. लक्ष विचलित केल्याने सत्य बदलणार नाही, असा टोला राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी( Sri Lanka Crisis Rahul Gandhi ) ट्विट करत भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून मोदी सरकावर ( Rahul Gandhi on Indian economy ) टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की लोकांचे लक्ष वळवल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. भारत श्रीलंकेसारखा दिसतो. त्यांनी ट्विटमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून श्रीलंकेबरोर असलेल्या तीन गोष्टींची तुलना केली आहे. यात बेरोजगारी, पेट्रोलची किंमत आणि जातीय दंगल यांचा समावेश आहे. यामध्ये त्यांनी २०१२ ते २०२१ पर्यंतचे आकडेवारी दाखविला आहे. याआधीही राहुल गांधींनी भारताच्या आर्थिक स्थितीची श्रीलंकेशी तुलना केली आहे. ते म्हणाले होते की, श्रीलंकेत सत्य जनतेपासून लपवले गेले. त्याचप्रमाणे भारतातही भाजप आणि आरएसएसच्या लोकांनी देशातील जनतेपासून सत्य लपवले आहे. तेथे सत्य बाहेर आले आहे. भारतातही सत्य बाहेर येईल.

लोकांना दैनंदिन खर्च भागविण्यासाठी घ्यावे लागणार कर्ज- दरम्यान, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी महागाईवरून सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, तुम्ही कष्टाने कमविलेल्या पैशाला महागाईमुळे फटका बसत आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गाचे उत्पन्न वाढेल, असे भाजप सरकारचे एकही आर्थिक धोरण नाही. लोकांना त्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी कर्ज घ्यावे लागणार नाही, अशी भीती वाटते.

आता पावले उचलली तर महागाई नियंत्रणात येईल- महागाईबाबत सरकारने कानाडोळा केल्याचा दावा काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला. महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण होत आहे. या सरकारने वेळ न दवडता जनतेच्या खिशात पैसा टाकून खप वाढवावा, असे त्या म्हणाल्या. महागाई रोखण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात करण्यासारखी पावले उचलली तरच महागाई नियंत्रणात येईल, असेही सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटले.

हेही वाचा-Assam Flood 4 lakh affected : आसाममध्ये पुरासह भूस्खलनाचा कहर, आठ जणांचा मृत्यू, 4 लाख लोकांना फटका

हेही वाचा-Madhya Pradesh tiger cubs rescue : पाण्याच्या शोधात निघालेल्या बछड्यांना ग्रामस्थांची काठ्यांनी मारहाण, वनविभागाकडून सुटका

हेही वाचा-विद्यार्थ्याने दाखविली जिद्द, अपघात झाल्यानंतर स्ट्रेचरवर झोपून दिली बारावीची परीक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.