ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Replied Lok Sabha Notice: मोदींसंदर्भात विशेषाधिकार भंगाच्या नोटीसला राहुल गांधींचं उत्तर

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवरील वक्तव्याबाबत लोकसभा सचिवालयात दिलेल्या विशेषाधिकार भंगाच्या सूचनेला उत्तर दिल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी हे मित्र असल्याचे म्हटले होते.

Rahul Gandhi sent reply to breach of privilege notice over remarks on PM
विशेषाधिकार भंगाच्या नोटीसला राहुल गांधींनी दिलं उत्तर.. मोदींवर केलं होतं वक्तव्य..
author img

By

Published : Feb 16, 2023, 12:30 PM IST

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकसभेत केलेल्या वक्तव्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सदस्यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींना विशेषाधिकार भंगाची नोटीस पाठवली होती. या नोटिशीला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभा सचिवालयात सविस्तर उत्तर सादर केले आहे. सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ७ फेब्रुवारी रोजी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधानांविरोधात टीका केली होती.

  • Rahul Gandhi sent reply to breach of privilege notice over remarks on PM. He replied to LS Secretariat on notice to him on Privilege Motion by BJP MP Nishikant Dubey&Parliamentary Affairs Min Pralhad Joshi over his speech during discussion on President's Address: Congress Sources pic.twitter.com/bdrZtuXmV2

    — ANI (@ANI) February 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वक्तव्याचे केले समर्थन: राहुल यांना 10 फेब्रुवारी रोजी लिहिलेल्या पत्रात, लोकसभा सचिवालयाने त्यांना भाजप खासदार निशिकांत दुबे आणि प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या विरोधात बजावलेल्या विशेषाधिकार भंग नोटीसचे उत्तर 15 फेब्रुवारीपर्यंत लोकसभा अध्यक्षांच्या विचारार्थ सादर करण्यास सांगितले होते. राहुल गांधींच्या ७ फेब्रुवारीच्या भाषणावर भाजप खासदारांनी नोटीस बजावली होती, ज्यात त्यांनी हिंडेनबर्ग-अदानी प्रकरणावर भाष्य केले होते. राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे समर्थन केल्याचे सूत्रांनी सांगितले.

कायद्यांची उदाहरणे देत सविस्तर उत्तर: राहुल यांनी विविध कायदे आणि उदाहरणे देत अनेक पानांत सविस्तर उत्तर दिले आहे. सोमवारी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ वायनाड येथे एका मेळाव्याला संबोधित करताना, राहुल यांनी सभागृहातील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणातील अनेक टिप्पण्या हटविण्याच्या निर्णयावर टीका केली. काँग्रेस नेत्याने असेही म्हटले होते की त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आलेल्या त्यांच्या प्रत्येक टिप्पणीबद्दल माहिती आणि पुरावे दिले आहेत.

राहुल गांधींचे वक्तव्य निराधार: राहुल गांधींनी लोकसभेत भाषण करताना हिंडेनबर्ग प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेक प्रश्न विचारले होते. मोदी आणि अदानी यांच्यातील संबंध उघड करण्याची मागणीही राहुल गांधी यांनी यावेळी केली होती. दुबे आणि संसदीय कार्य मंत्री जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेल्या त्यांच्या नोटीसमध्ये राहुल गांधींचे वक्तव्य निराधार असल्याचा आरोप केला आणि त्यांना असंसदीय आणि अपमानास्पद टिप्पणी म्हणून संबोधले होते.

लोकसभेत काय म्हणाले होते राहुल गांधी : लोकसभेत बोलताना खासदार राहुल गांधी म्हणाले होते की, संसदेत मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी कुठलेही स्पष्ठीकरण दिलेले नाही. आम्ही अदानींच्या यांच्या कंपन्यांमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. संसदेत पंतप्रधान मोदी अदानींच्या चौकशीबाबत काहीच बोलले नाहीत. जर ते दोघे मित्र नसतील तर अदानींची चौकशी व्हायला हवी, असे पंतप्रधानांनी सांगायला हवे होते. मात्र तसे न झाल्याने यावरून हे स्पष्ट आहे की, पंतप्रधान गौतम अदानी संरक्षण करत आहेत.

हेही वाचा: Rahul Gandhi : पंतप्रधानांकडून अदानींचे संरक्षण! राहुल गांधींचा मोदींच्या भाषणावर पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.