नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना विरोधकांवर टीका केली. आज संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षात केंद्र सरकाने केलेल्या कार्याचा उल्लेख केला. दरम्यान, खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर टीका केली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी : खासदार राहुल गांधी म्हणाले की, संसदेत मी काल उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी कुठलेही स्पष्ठीकरण दिलेले नाही. आम्ही अदानींच्या गैरव्यवहाराबाबत चौकशीची मागणी केली होती. संसदेत पंतप्रधान मोदी चौकशीबाबत काहीच बोलले नाहीत. जर ते मित्र नसतील तर चौकशी व्हायला हवी असे पंतप्रधानांनी सांगायला हवे होते. यावरून हे स्पष्ट आहे की पंतप्रधान गौतम अदानी संरक्षण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अदानींचे संरक्षण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अदानींच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी : अदानी मुद्द्यावर संसदेत चर्चा होऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असे म्हणत, मोदी सरकारने यावर संसदेत चर्चा होऊ द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. तसेच, मी 2-3 वर्षांपासून हा मुद्दा सतत मांडत आहे. मात्र, यावर बोलू दिले जात नाही असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत. सरकारचा फक्त 'हम दो, हमारे दो' असाच अजेंडा राहीलेला आहे, असा टोलाही राहुल गांधी यांनी लोकसभेत लगावला होता. तसेच, अदानींवर संसदेत चर्चेची मोदी सरकारला भीती वाटते, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.
'अदानींसाठी नियम बदलले': राहुल गांधी म्हणाले की 'अदानी विमानतळासाठी नियम बदलले, नियम बदलले गेले आणि नियम कोणी बदलले, हे महत्त्वाचे आहे. विमानतळ व्यवसायात नसेल तर तो विमानतळ ताब्यात घेऊ शकत नाही, असा नियम होता. भारत सरकारने अदानीसाठी हा नियम बदलला आहे. अनेक विमानतळं त्यांना चालवण्यास देण्यात आली. अदानींसाठी भारत सरकारने हे सगळे नियम बदलले आहेत, असे दिसते.
हेही वाचा : PM Modi Speech: ई़डीने तुम्हाला एकत्र बसवले; पंतप्रधानांचा विरोधकांवर घणाघात