श्रीनगर - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आज (गुरुवारी) आणि उद्या (शुक्रवारी) अशा दोन दिवसांच्या जम्मूच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. माहितीनुसार जम्मू विमानतळावर उतरल्यानंतर राहुल गांधी हे थेट कटरा येथे वैष्णवीदेवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जम्मू आणि कटरा या मार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कटरा येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधी हे माता वैष्णवीदेवीच्या दर्शनासाठी पायी जाणार आहेत. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेता आणि जम्मू काँग्रेसचे पदाधिकारीदेखील वैष्णवीदेवी यात्रेत सामील होणार आहेत. राहुल गांधी दुपारी वैष्णव वीला पोहोचणार आहेत. तिथे सायंकाळी आरतीत सहभागी घेणार आहेत. रात्री माता वैष्णवदेवी भवनमध्ये आराम करणार आहेत.
हेही वाचा-भारत कोणत्याही आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम- राजनाथ सिंह
राहुल गांधी हे शुक्रवारी जम्मूमधील पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.
हेही वाचा-नव्या एसओपीवरून गोवा मुख्यमंत्र्यांचे घुमजाव.. ऐन चतुर्थीच्या तोंडावर लागू केलेला निर्णय मागे
9 ऑगस्ट रोजी दिली जम्मू-काश्मीरला भेट -
राहुल गांधी यांनी यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी केंद्रशासित प्रदेशाला भेट दिली होती. मागच्या दौऱ्यात राहुल गांधींनी श्रीनगरमधील नवीन काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन केले होते. यासोबतच काँग्रेस नेत्यांनी जम्मू -काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यातील खीर भवानी मंदिर आणि हजरतबाल दर्गाला भेट दिली. दोन दिवसांच्या दौऱ्यावर ते जम्मू-काश्मीरला पोहोचले होते. राहुल गांधी जम्मू -काश्मीरच्या प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्या मुलाच्या लग्नाच्या 'रिसेप्शन'ला उपस्थित होते. पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर, वायनाडचे खासदार गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.