ETV Bharat / bharat

Rahul Gandhi targets Adani Group : 'अदानीं'कडून ३२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा राहुल गांधींचा दावा, अदानी-शरद पवार भेटीबाबत म्हणाले...

Rahul Gandhi targets Adani Group : काँग्रेस नेते राहुल गांधींनी अदानी समूहावर जोरदार निशाणा साधलाय. वाढत्या महागाईमध्ये अदानी समूहाचा हात असल्याचा त्यांनी आज पत्रकार परिषदेत दावा केला. अदानी ग्रुपचे सीईओ गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीबाबतही राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली.

Rahul Gandhi targets Adani Group
Rahul Gandhi targets Adani Group
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 12:51 PM IST

नवी दिल्ली Rahul Gandhi targets Adani Group : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट अदानी ग्रुपवर हल्लाबोल करत या ग्रुपनं 32 हजार कोटींचा घोटाळा केल्याचं सांगितलं. काँग्रेस खासदार राहूल गांधींनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत कोळसा दरवाढीचा रिपोर्ट दाखवत अदानी समूहावर टीका केलीय.

अदानींवर जोरदार निशाणा : अदानीच्या मुद्द्यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले,'यावेळी जनतेच्या खिशातून चोरी होत आहे. तुम्ही स्विच बटण दाबलं की अदानीच्या खिशात पैसे येतात. वेगवेगळ्या देशांमध्ये याची चौकशी सुरू आहे. लोक प्रश्न विचारत आहेत पण भारतात काहीच होत नाही. अदानी इंडोनेशियामध्ये कोळसा खरेदी करतात. कोळसा भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट होते. आमच्या विजेचे दर वाढत आहेत. ते (अदानी) गरीब लोकांकडून पैसे घेतात. ही बिनदिक्कतपणे चोरी आहे, असं काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले.

तर मी शरद पवारांनाही विचारलं असंत : अदानी मुद्द्यावर विरोधी पक्षांची 'इंडिया' आघाडी आहे का, मग एकजूट असूनही शरद पवार अदानींच्या भेटीवर प्रश्न का उपस्थित करत नाहीत? असं विचारल असता यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, मी शरद पवारांना विचारलं नाही. ते देशाचे पंतप्रधान नाहीत. शरद पवार बचाव करत नाहीत. अदानी हे मिस्टर मोदी आहेत. म्हणूनच मी मोदींना हा प्रश्न विचारला. जर शरद पवार भारताचे पंतप्रधान म्हणून बसून अदानींना संरक्षण देत असतील तर मी हा प्रश्न शरद पवारांना विचारला असता, असंही राहूल गांधी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi Interaction Porters : देशाचं ओझं वाहणारे आज सक्तीनं ओझ्याखाली दबले, हमालांच्या दुर्व्यवस्थेबद्दल राहुल गांधींची खंत
  2. Owaisis challenge to Rahul : राहुल गांधींनी वायनाडऐवजी 'या'ठिकाणाहून निवडणूक लढवावी; ओवेसी यांचं चॅलेंज
  3. Rahul Gandhi On Modi : जात जनगणनेच्या बहाण्याने महिला विधेयकाची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याचा मोदी सरकारचा डाव - राहुल गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.