अहमदाबाद : काँग्रेस नेता राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. सुरत न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्यास नकार देत गुजरात उच्च न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे राहुल गांधी यांना २०२४ सालची लोकसभा निवडणूक लढवता येणार नाहीच. शिवाय त्यांची खासदारकीही रद्दच राहणार आहे. दरम्यान गुजरात उच्च न्यायालयाच्या हा निर्णय 'न्यायाचा उपहास' असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे राज्यसभा सदस्य रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिली आहे. तर गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिली आहे.
राहुल गांधींनी 'मोदी' आडनावाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबतचा खटल्यावर बदनामी गुजरात उच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या शिक्षेला आव्हान देणारी याचिका राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयात दाखल केली होती. दोन वर्षांच्या शिक्षेमुळे राहुल गांधींना लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागले.
सुट्ट्या पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया: मानहानीच्या प्रकरणात, राहुल गांधी यांनी २५ एप्रिल २०२३ रोजी गुजरात उच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल केली होती. यामध्ये २९ एप्रिल २०२३ रोजी पहिली सुनावणी झाली. त्यानंतर २ मे २०२३ रोजी उच्च न्यायालयात दुसरी सुनावणी होऊन सुनावणी पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले.
सुरत सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान: राहुल गांधी २०१९ मध्ये, मोदींच्या भाषणावर टिप्पणी केल्याबद्दल भाजपचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर राहुल गांधींना समन्स पाठवण्यात आल्यावर याचा खटला सुरत न्यायालयात चालला. या न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे लोकसभेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांचे खासदारपद रद्द केले. या निर्णयानंतर काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली.
काय आहे प्रकरण ? : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकातील कोलार येथे केलेल्या भाषणात मोदी आडनावाबाबत राहुल गांधी यांनी अवमानकारक विधान केले. याप्रकरणी भाजपाचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर सुरत न्यायालयात बदनामीचा दावा दाखल केला. तक्रारीत 'मोदी' आडनाव असलेल्या प्रत्येकाची राहुल गांधी यांनी बदनामी केल्याचा आरोप केला.
हेही वाचा-