ETV Bharat / bharat

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ; मानहानीच्या खटल्यात गुजरात हायकोर्टाने ठोठावलेली शिक्षा कायम

राहुल गांधींच्या मानहानीच्या खटल्याची शुक्रवारी गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी हायकोर्टात झालेल्या सुनावणीनंतर राहुल गांधींच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयाला राहुल गांधी यांचे वकील सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असले तरी गुजरात उच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळून लावली. राहुल गांधी यांची याचिका न्यायमूर्ती हेमंत प्रचारक यांनी फेटाळून लावली.

Rahul Gandhi
राहुल गांधी
author img

By

Published : Jul 7, 2023, 12:35 PM IST

अहमदाबाद : कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल पूर्णपणे योग्य आहे. कारण गुजरात हायकोर्टाला यात ढवळाढवळ करणे योग्य वाटत नाही. असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. मोदी आडनाव वक्तव्यावरून झालेल्या मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा झटका मिळाला आहे. मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. याबाबत राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

सदस्यत्व रद्द : लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने रद्द केले होते. राहुल केरळमधील वायनाडमधून खासदार होते. खरे तर, लोकप्रतिनिधी कायद्यात अशी तरतूद आहे की, एखाद्या प्रकरणात खासदार आणि आमदाराला 2 वर्षांपेक्षा जास्त किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास, त्याचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभेतून) रद्द केले जाते. एवढेच नाही तर शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सहा वर्षे निवडणूक लढविण्यासही ते अपात्र ठरतात. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी २ एप्रिल रोजी सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. राहुल गांधींनी एकूण दोन अर्ज दाखल केले आहेत. पहिल्या याचिकेत दोषसिद्धीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती, तर दुसऱ्या याचिकेत अपील निकाली निघेपर्यंत दोषसिद्धीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती.

  • #WATCH | Gujarat High Court verdict on defamation case against Rahul Gandhi | Congress leader Shaktisinh Gohil says, "Rahul Gandhi spoke against Lalit Modi-Nirav Modi who looted the country and fled. He said this in Karnataka. Surat Court had no jurisdiction. The procedure was… pic.twitter.com/aaCPYOLiev

    — ANI (@ANI) July 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • #WATCH | Gujarat High Court verdict on defamation case against Rahul Gandhi | Lawyer of petitioner & BJP MLA Purnesh Modi, Advocate Harshit Tolia says, "We also placed on record a statement reported in newspapers wherein he (Rahul Gandhi) had said, "I am not Veer Savarkar, won't… pic.twitter.com/mqNwsQiuVb

राहुल गांधी यांच्यावर बदनामीचे अनेक खटले : राहुल गांधींना हायकोर्टातून दिलासा मिळाला नाही. मात्र, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय अद्याप खुला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यास त्यांचे सदस्यत्व बहाल केले जाऊ शकते. सुरतमधील पूर्णेश मोदी प्रकरण ज्यामध्ये राहुल गांधी दोषी आढळले होते, त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर बदनामीचे अनेक खटले दाखल करण्यात आले होते.

बिहारमध्येही मानहानीचा खटला : अशीच एक याचिका राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी दाखल केली होती. पाटणा उच्च न्यायालयाने 4 जुलै रोजी फौजदारी मानहानीच्या खटल्यातील कार्यवाहीला 12 जानेवारी 2023 पर्यंत स्थगिती दिली. झारखंड उच्च न्यायालयाने 4 जुलै रोजी अधिवक्ता प्रदीप मोदी यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या आणखी एका खटल्याच्या संदर्भात आदेश दिला. 16 ऑगस्टला होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत राहुल गांधींवर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे सांगण्यात आले.

  • #WATCH | Congress workers raise slogans and protest at party Headquarters in Delhi after Gujarat High Court's verdict on defamation case against Rahul Gandhi pic.twitter.com/K80KfGs5Wh

हेही वाचा :

  1. Modi Surname Case : मोदी आडनावावरून टीका, राहुल गांधींना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
  2. Lalu Yadav on Rahul Gandhi : चकाचक दाढी करून बोहल्यावर चढा; लालूंचा राहुल गांधींना भन्नाट सल्ला
  3. Bawankules On Congress : काँग्रेसला मत देणे म्हणजे देशात अराजकता निर्माण करणे, बावनकुळे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.