ETV Bharat / bharat

Ragging In College : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रकरणी ४४ विद्यार्थ्यांवर कारवाई - हल्द्वानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

हल्द्वानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Haldwani Government Medical College) पुन्हा एकदा रॅगिंगचे प्रकरण समोर आले आहे. (Ragging in Haldwani Government Medical College). याप्रकरणी कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीने 44 विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. (Action against 44 students in ragging case). रॅगिंग घेणाऱ्या ज्येष्ठ विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 11, 2022, 7:41 PM IST

हल्द्वानी (उत्तराखंड) : हल्द्वानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Haldwani Government Medical College) रॅगिंगच्या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (Ragging in Haldwani Government Medical College). गेल्या वर्षी ज्युनिअर विद्यार्थ्यी मुंडण करून फिरत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्याचवेळी, आता पुन्हा एका ज्युनियर विद्यार्थ्यासोबत मोबाईलवर रॅगिंग झाल्याची चर्चा चव्हाट्यावर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात कॉलेज प्रशासनाने एका विद्यार्थ्याला 50,000 रुपयांचा दंड ठोठावला असून त्याला वसतिगृहातून बाहेर काढले आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणात अन्य 43 विद्यार्थ्यांवर 25-25 हजार रुपयांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. (Action against 44 students in ragging case).

द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केले रॅगिंग : MBBS द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांवर व्हिडिओ कॉलद्वारे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण 9 डिसेंबरच्या रात्रीचे आहे. 2021 च्या बॅचच्या एका वरिष्ठाने ज्युनियरला कॉल केला आणि त्याला इतर विद्यार्थ्यांसह त्याच्या खोलीत बोलावून व्हाईट कोट समारंभाची माहिती देण्यास सांगितले. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे रॅगिंग करून कनिष्ठ विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली. त्यासोबतच त्यांना कोंबडेही बनवण्यात आले. झालेल्या घटनेची तक्रार एका कनिष्ठ विद्यार्थ्याने महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अरुण जोशी यांच्याकडे केली.

रॅगिंगची घटना घडल्याचे मान्य केले : त्यानंतर प्राचार्य आणि वॉर्डन टीमसोबत हॉस्टेलमध्ये पोहोचले. प्रथम कनिष्ठ विद्यार्थ्यांकडून माहिती घेण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ विद्यार्थ्यांशी याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीपर्यंत पोहोचले. अँटी रॅगिंग समितीच्या बैठकीत सिटी मॅजिस्ट्रेट रिचा सिंग, एसपी सिटी हरबंश सिंग आदींचा सहभाग होता. समितीने सर्व विद्यार्थी आणि पीडित विद्यार्थ्याच्या पालकांचे जबाबही घेतले. त्यानंतर ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी रॅगिंगची घटना घडल्याचे मान्य केले.

विद्यार्थ्यांना दंड ठोठावला : या संपूर्ण प्रकरणाचा निर्णय घेत समितीने मोबाइल वापरणाऱ्या ज्येष्ठ विद्यार्थ्याला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून त्याला तीन महिन्यांसाठी वसतिगृहातून बाहेर काढलं आहे. याशिवाय 43 ज्येष्ठ विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. महाविद्यालयात कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन केले जाणार नाही, असे प्राचार्य प्रा. जोशी यांनी सांगितले. भविष्यात अशी तक्रार आल्यास कडक कारवाई केली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.