ETV Bharat / bharat

Raebareli Road Accident : धुक्याचा कहर! डंपर घुसला चहाच्या दुकानात; 6 जणांचा मृत्यू - डंपर घुसला चहाच्या दुकानात

उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यात धुक्यामुळे एक डंपर अनियंत्रित होऊन चहाच्या दुकानात घुसला. (dumper hit tea shop in Raebareli). या डंपरने चहाच्या दुकानात उपस्थित 10 लोकांना धडक मारली. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. (Road Accident due to fog).(Raebareli Road Accident).

Raebareli Road Accident
रायबरेली रोड अपघात
author img

By

Published : Jan 11, 2023, 3:40 PM IST

रायबरेली (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यात धुक्याच्या कहराने 6 जणांचा बळी घेतला. (Road Accident due to fog). मंगळवारी सकाळी गुरुबख्शगंज पोलीस स्टेशन हद्दीतील खागिया खेडा गावाजवळ बांदा बहराइच राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या दुकानात एका डंपरने 10 जणांना धडक दिली. (dumper hit tea shop in Raebareli). या अपघातात लोकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर रुग्णालयात नेत असताना एकाचा मृत्यू झाला. त्याचवेळी शेजारून वाहणाऱ्या कालव्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. अपघातात 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा दंडाधिकारी माला श्रीवास्तव यांनी सांगितले की, पीडितांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे. डंपर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. (Raebareli Road Accident).

अपघातात 4 जण गंभीर जखमी : गुरुबख्शगंज पोलिस स्टेशन हद्दीतील बांदा बहराइच राष्ट्रीय महामार्गावर खागिया खेडा गावाजवळील एका चहाच्या टपरी वर मंगळवारी सकाळी गावातील सुमारे 12 जण चहा पीत होते. त्यावेळी रस्त्यावर दाट धुके होते. या धुक्यात अचानक एक डंपर चहाच्या दुकानाकडे वेगाने येताना दिसला. उपस्थित ग्रामस्थांना काही समजेपर्यंत त्याने 10 जणांनी धडक दिली. या अपघातात गावातील लल्लूसह 6 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी 4 जण गंभीर जखमी झाले.

चालक कानपूरचा रहिवासी : अपघातची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी माहिती मिळताच जखमींना उपचारासाठी सीएचसीमध्ये पाठवले. गावचे माजी प्रमुख तिलक सिंह यांनी सांगितले की, काही गावकरी चहाच्या दुकानात चहा पीत होते. दरम्यान, अचानक एक डंपर दुकानात घुसल्याने तीन जण ठार तर पाच जण जखमी झाले. डंपर चालक व डंपरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कानपूरचा रहिवासी असलेल्या चालक सुनीलने सांगितले की, धुक्यामुळे काहीही दिसत नव्हते आणि हा अपघात झाला. ट्रक कानपूरच्या रमादेवीचा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.