ETV Bharat / bharat

Ganja Seized In Hyderabad : उस्मानाबादला जाणारा 1820 किलो गांजा रचकोंडा पोलिसांनी पकडला

author img

By

Published : Nov 25, 2021, 7:44 PM IST

Updated : Nov 25, 2021, 8:04 PM IST

रचकोंडा पोलिसांनी (Rachakonda Police) गुरुवारी आंतरराज्यीय गांजा तस्कर टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून, यातील चार आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत. आरोपींकडून 1 हजार 820 किलो गांजा (Seized 1820 kg of Ganja) जप्त करण्यात आला आहे. मराठमोळे आयपीएस महेश भागवत (IPS Mahesh Bhagwat) यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेशल टीमने ही कारवाई केली आहे.

Rachakonda police seized ganja
रचकोंडा पोलिसांनी पकडला गांजा

हैदराबाद - रचकोंडा पोलिसांनी (Rachakonda Police) गुरुवारी आंतरराज्यीय गांजा तस्कर टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून, यातील चार आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत. आरोपींकडून 1 हजार 820 किलो गांजा (Seized 1820 kg of Ganja) जप्त करण्यात आला आहे. याची एकूण किंमत जवळपास 3 कोटी रुपये आहे. ही टोळी आंध्र प्रदेशातील सिलेरू येथून हैदराबादमार्गे महाराष्ट्रात गांजाची तस्करी करत होती, अशी माहिती रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत (Rachakonda Police CP Mahesh Bhagwat) यांनी दिली. मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

महेश भागवत - पोलीस आयुक्त, रचकोंडा आयुक्तालय
  • पाच आरोपींना अटक -

एलबी नगर झोनच्या विशेष ऑपरेशन टीम (SOT) आणि अब्दुल्लापूरमेट पोलिसांनी मिळून आज (25 नोव्हेंबर) ही कारवाई केली आहे. यात संजय बालाजी काळे (30), अभिमान कल्याण पवार (49), संजय चौघुले (45), भरत कोलाप्पा येवले (37), शेख रहिदुल (27) असे अटक केलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. यातील रहिदुल हा पश्चिम बंगालमधाल असून, इतर चार आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत. तसेच संजय लक्ष्मण शिंदे हा आरोपी फरार असून, तो उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

Rachakonda police
रचकोंडा पोलिसांनी पकडला गांजा
  • उस्मानाबादला जात होत गांजा -

आठवडाभरापूर्वी संजय लक्ष्मण शिंदे याने सिलेरू एजन्सी परिसरात त्यांच्या पुरवठादाराकडून 2 हजार किलो गांजा मागवला होता. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही ठिकाणी पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याने, त्याने शेख रहिदुलला सिलेरू ते महाराष्ट्रातील उस्मानाबादला गांजा वाहून नेण्यासाठी सांगितले होते. दरम्यान, संजय बालाजी काळे, अभिमान कल्याण पवार, संजय चौघुले, आणि भरत हे एका कारमध्ये हैदराबादला आले आणि चौतुप्पल येथील पंथंगी टोल प्लाझा येथे थांबले होते. त्यानंतर गांजा भरलेला ट्रक टोल प्लाझा ओलांडून त्या आरोपींपर्यंत पोहचला. त्याचवेळी रचकोंडा पोलिसांच्या एसओटी टीमने कारवाई करत हा गांजा पकडला आहे.

Rachakonda police
रचकोंडा पोलिसांनी पकडला गांजा
  • मागील आठवड्यातही पकडला होता 1240 किलो गांजा -

रचकोंडा पोलिसांनी (Rachakonda Police) आंतररराज्य ड्रग रॅकेट (inter state drug peddlers) चालवणाऱ्या पेडलरला अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 3 कार आणि 1 हजार 240 किलो गांजा जप्त केला होता. या गांजाची किंमत 2 कोटी रुपयांहून अधिक आहे. पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे विशाखापट्टणममधील सिलेरूमधून महाराष्ट्रात गांजा नेणार होते, अशी माहिती रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत (Rachakonda CP Mahesh Bhagwat) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Last Updated : Nov 25, 2021, 8:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.