ETV Bharat / bharat

Drug Peddling : 240 किलो गांजा केला जप्त; राचकोंडा पोलिसांची कारवाई, मुंबईतील 2 आरोपींसह 10 जणांना अटक

author img

By

Published : Dec 18, 2021, 7:33 AM IST

Updated : Dec 19, 2021, 11:16 AM IST

आंध्र प्रदेशातील नरसीपट्टणम येथून हैदराबादमार्गे (Drug Peddling in Hyderabad) मुंबईत गांजाची वाहतूक करणाऱ्या 10 जणांना अटक केली. पोलिसांनी 240 किलो गांजा, 8 लाख रुपये, एक ट्रक आणि कार असा एकूण 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Drug Peddling
गांजा

हैदराबाद - राचकोंडा स्पेशल ऑपरेशन टीमने वनस्थलीपुरम पोलिसांसह शुक्रवारी आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आंध्र प्रदेशातील नरसीपट्टणम येथून हैदराबादमार्गे (Drug Peddling in Hyderabad) मुंबईत गांजाची वाहतूक करणाऱ्या 10 जणांना अटक केली. पोलिसांनी 240 किलो गांजा, 8 लाख रुपये, एक ट्रक आणि कार असा एकूण 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राचकोंडा पोलिसांनी 240 किलो गांजा जप्त केला.

संतोष लालजी बरनवाल (44) , तेजस कुमार (36) , शिवन कृष्णन (46), उपेंद्र (46), मोहम्मद शमीर (35), हरीश पुकुट्टी (31), सुमेश (30), शेख जिलानी (25) नरसिपट्टणम, ए.प्रकाश (23) आणि एन.पॉल डॅनियल (24) यांना अटक करण्यात आली आहे. तर सुब्बा राव (३२) हा मुख्य ड्रग्ज पुरवठादार फरार आहे. संतोष लालजी बरनवाल आणि तेजस कुमार हे मुंबईमधील रहिवासी आहेत.

केरळमधील शिवन कृष्णन दोन वर्षांपूर्वी कामाच्या शोधात ओडिशात स्थलांतरित झाला होता. यावेळी त्याने सुब्बा राव यांच्यासमवेत ड्रग पुरवठादारांकडे मदतनीस म्हणून काम केले. यानंतर त्याने शेख जिलानी, प्रकाश आणि डॅनियल यांच्यासोबत स्वतःचा व्यवसाय सुरू केला. यातच त्यांचा संपर्क उपेंद्रशी आला. त्याची मदत घेत त्याने मुंबईतील संतोष आणि तेजस कुमार यांना अंमली पदार्थ विकले, असे राचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी सांगितले.

शिवन कृष्णनने त्याच्या साथीदारांसह सुब्बा राव यांच्याकडून 240 किलो गांजा खरेदी केला. तो गांजा 110 पॅकेटमध्ये पॅक करून नरसीपट्टणममधील गुप्त ठिकाणी लपवून ठेवला. त्यानंतर तो केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र दरम्यान ट्रकवर काम करणाऱ्या समीर, हरीश आणि सुमेश यांच्या संपर्कात आला. हा गांजा मुंबईतील एका केमिकल कंपनीकडे जाणार्‍या लोडमध्ये लपवून ठेवल्याचे भागवत यांनी सांगितले. उपेंद्रने माहिती दिल्यानंतर लालजी आणि तेजस कुमार 8 लाख रुपयांसह मिनीव्हॅनमध्ये हैदराबादला आले. पहाटेच्या सुमारास वनस्थलीपुरममधील ऑटो नगर येथे ते थांबले होते तेव्हा त्यांना पकडण्यात आले आहे.

Last Updated : Dec 19, 2021, 11:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.