ETV Bharat / bharat

रचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांना पितृशोक - cp mahesh bhagwat father passed away

तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व रचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांचे वडील मुरलीधर रंगनाथ भागवत यांचे शनिवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

murlidhar bhagwat
मुरलीधर रंगनाथ भागवत यांचे निधन
author img

By

Published : Mar 22, 2021, 4:31 PM IST

Updated : Mar 22, 2021, 4:38 PM IST

हैदराबाद - तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व रचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांचे वडील मुरलीधर रंगनाथ भागवत यांचे शनिवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हैदराबादमधील कामिनेनी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा - 'कोरोनाने पोलिसांच्या कामाचे स्वरुप बदलले', मराठमोळे पोलीस आयुक्त महेश भागवत यांची खास मुलाखत

मुरलीधर भागवत हे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक होते. भागवत कुटुंब हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पार्थडीचे रहिवासी आहेत. मुरलीधर भागवत यांचा मुलगा महेश भागवत हे तेलंगाणामधील रचाकोंडा विभागाचे पोलीस आयुक्त आहेत.

डिसेंबर 2019 मध्ये त्यांना मेंदूचा आजार झाला होता. तसेच उजवा हात, पायाला पक्षाघात झाला होता. त्यातून ते बरेदेखील झाले होते. सप्टेंबर 2020 मध्ये वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते 14 दिवस क्वारंटाईन होऊन कोरोनावर त्यांनी विजय मिळवला होता. मात्र, मागील दोन महिन्यांपासून त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत गेले. शनिवारी रात्री कामिनेनी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याची माहिती पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिली आहे. वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालत राहू आणि त्यांनी शिकवलेले मूल्य आत्मसात करू, अशी भावना महेश भागवत यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - पोलीस आयुक्त महेश भागवतांची अपघातग्रस्तांना मदत

Last Updated : Mar 22, 2021, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.