ETV Bharat / bharat

पंजाब सरकारमधील आरोग्य मंत्र्याला भ्रष्टाचार प्रकरणात अटक, भगवंत मान यांनी विजय सिंगला यांना मंत्रिपदावरून हटवले - विजय सिंगला यांना मंत्रिपदावरून हटवले

विजय सिंगला यांना कॅबिनेट मंत्रिपदावरून हटवण्यात ( Bhagwant Mann removed Vijay Singla) आले आहे. विजय सिंगला हे पंजाब सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते. सिंगला यांच्याविरोधात भ्रष्टाचारात गुंतल्याचे भक्कम पुरावे सापडले आहेत. सिंगला यांना अटक करण्यात आले आहे.

Vijay Singla removed from cabinet minister post
विजय सिंगला यांना मंत्रिपदावरून हटवले
author img

By

Published : May 24, 2022, 1:29 PM IST

Updated : May 24, 2022, 3:09 PM IST

(चंदिगड) पंजाब - पंजाबमध्ये सत्तेत आलेल्या आप सरकारने भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कारवाईदेखील केली आहे. ही कारवाई त्यांनी थेट मंत्रिमंडळातीलच आरोग्य मंत्री विजय सिंगला यांच्यावर केली आहे. भ्रष्टाचाराचे पुरावे आढळल्यामुळे सिंगला यांना कॅबिनेट मंत्रिपदावरून हटवण्यात ( Bhagwant Mann removed Vijay Singla) आले आहे. तसेच त्यांना अटक करण्यात आले आहे.

विजय सिंगला हे पंजाब सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते. सिंगला यांच्याविरोधात भ्रष्टाचारात गुंतल्याचे भक्कम पुरावे सापडले आहेत. सिंगला हे ठेक्यांसाठी अधिकाऱ्यांकडून 1 टक्के कमिशन मागत असल्याचा आरोप आहे. याबाबत मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर ही कारवाई झाली आहे. सिंगला यांना अटक करण्यात आले आहे.

  • Aam Aadmi Party is the only party that has the integrity, courage & uprightness to take action against their own on grounds of corruption.

    We saw it in Delhi, now we are witnessing it in Punjab.

    ZERO TOLERANCE FOR CORRUPTION.

    Commendable decision by CM @BhagwantMann

    — Raghav Chadha (@raghav_chadha) May 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Ram Gopal Verma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेखाली ही कारवाई झाल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. सिंगला यांच्याविरोधात तक्रारी मिळाल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही कारवाई केली. एका मुख्यमंत्र्याने आपल्याच मंत्रिमंडळातील नेत्यावर कारवाई केल्याची ही देशातील दुसरी घटना आहे. 2015 साली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आपल्याच मंत्र्याला पदावरून हटवले होते. या कारवाईनंतर एक टक्के भ्रष्टाचार देखील सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिला आहे. लोकांनी मोठ्या आशेने आप पक्षाला निवडून दिले आहे. आणि त्यांच्या अपेक्षांवर आम्हाला खरे उतरायचे आहे, असे भगवंत मान म्हणाले.

  • Punjab CM Bhagwant Mann sacks state's Health Minister Vijay Singla following complaints of corruption against him. He was demanding a 1% commission from officials for contracts. Concrete evidence found against Singla: Punjab CMO pic.twitter.com/YGFw1SYtzk

    — ANI (@ANI) May 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या कारवाई नंतर आप नेते राघव चढ्ढा यांनीही ट्विट करून भ्रष्टाचारविरोधात झालेल्या या कारवाईचे समर्थन केले. भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपल्याच लोकांवर कारवाई करणारा आम आदमी पक्ष हा देशातील एकमेव पक्ष आहे. आपण हे दिल्लीत पाहिले आहे आणि पंजाबमध्ये याची प्रचिती आली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांचा निर्णय कौतुकास्पद आहे, असे राघव चढ्ढा म्हणाले.

हेही वाचा - Statement of Bharti Singh's Beard : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे भारतीच्या वक्तव्यावर कारवाईचे संकेत - पंजाब, महाराष्ट्र सरकारकडून मागवला अहवाल

भ्रष्टाचार प्रतिबंधक हेल्पलाईन सुरू- पंजाबमधील भ्रष्टाचाराच्या तक्रारीबाबत निर्णय पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक हेल्पलाईन सुरू केली होती. हा व्हॉट्सअप क्रमांक 23 मार्च रोजी सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आला होता. जेव्हा कोणी तुमच्याकडे लाच मागेल तेव्हा लाच देऊ नका. लाच मागितल्याबद्दलचे संभाषण रेकॉर्ड करा. व्हॉट्सअॅप नंबरवर व्हिडिओ किंवाऑडिओ पाठवा. दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनीही पंजाबच्या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

आधीच 70 वर्षे उशीर -मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंजाबमधील बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे आश्वासन दिले होते. शहीद भगतसिंग नगर जिल्ह्यातील खटकर कलान गावात एका जाहीर सभेत त्यांनी आजपासूनच कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले होते. आम्ही एकही दिवस वाया घालवणार नाही. आधीच 70 वर्षे उशीर झाल्याचे सांगितले होते.

Last Updated : May 24, 2022, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.