ETV Bharat / bharat

GT vs PBKS : पंजाब किंग्जचा गुजरात टायटन्सवर आठ गडी राखून एकतर्फी विजय

पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर आठ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. पंजाबने गुजरातचे 144 धावांचे लक्ष्य दोन गडी गमावून 24 चेंडू राखून पूर्ण केले. ( IPL 2022, GT vs PBKS ) पंजाबचा हा पाचवा विजय असून ते आता गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत.

author img

By

Published : May 4, 2022, 7:24 AM IST

GT vs PBKS
GT vs PBKS

मुंबई - पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर आठ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. पंजाबने गुजरातने दिलेल्या 144 धावांचे लक्ष्य दोन गडी गमावून 24 चेंडू राखून पूर्ण केले. पंजाबचा हा पाचवा विजय असून ते आता गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. दुसरीकडे, गुजरातला मोसमातील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ( Punjab Kings beat Gujarat Titans by eight wickets ) पंजाबकडून शिखर धवनने 53 चेंडूत 62 धावा केल्या आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूत 30 धावा केल्या. याशिवाय भानुका राजपक्षेने 28 चेंडूत 40 धावा केल्या.

या विजयानंतर पंजाबने थेट 8व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. (Punjab Kings defeated Gujarat Titans) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. पराभवानंतरही गुजरात अव्वल स्थानावर आहे. गुणतालिकेत गुजरातनंतर लखनौ सुपर जायंट्स दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स तिसऱ्या तर सनरायझर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे. हैदराबाद, पंजाब आणि आरसीबी या सर्वांचे 10-10 गुण आहेत. उत्तम धावगतीच्या जोरावर पंजाबने आरसीबीचा पराभव केला

लियाम लिव्हिंगस्टोनने मोहम्मद शमीच्या शेवटच्या षटकात 28 धावा देत सामना संपवला. लिव्हिंगस्टोनने 16व्या षटकात शमीला सलग तीन षटकार ठोकले आणि त्यानंतर दोन चौकारही मारले. दिल्ली कॅपिटल्स ८ गुणांसह ७व्या तर कोलकाता नाईट रायडर्स ८व्या स्थानावर आहे. IPL इतिहासातील 2 सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स हे 9व्या आणि 10व्या स्थानावर आहेत.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गुजरातने पंजाबला 144 धावांचे लक्ष्य दिले होते, ते शिखर धवनच्या नाबाद 62 धावांच्या जोरावर पंजाबने सहज गाठले. भानुका राजपक्षेने 40 धावा केल्या. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरकडे ऑरेंज कॅप आहे. बटलरने 10 सामन्यात 588 धावा केल्या. या मोसमात त्याने आतापर्यंत 3 शतके ठोकली आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल 451 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर शिखर धवन गुजरातविरुद्ध अर्धशतक झळकावून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा - मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आजपासून मनसेचे आंदोलन, पहा क्षणाक्षणाची अपडेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.