नवी दिल्ली : पंजाबचा कारभार दिल्लीतून होऊ नये. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अरविंद केजरीवाल यांच्या दबावाखाली येऊ नये असही राहुल गांधी म्हणाले आहेत. भारतातील प्रत्येक राज्याचा इतिहास आहे. पंजाब हे राज पंजाबमधूनच चालवावा, पंजाब दिल्लीतून चालवू नये असा जोरदार टोला राहुल यांनी लगावला आहे. येथील सर्व प्रश्न पंजाबचे आहेत. ते प्रश्न पंजाबच्या दृष्टीने सोडवले पाहिजेत. यामध्ये कुणाचा रिमोट कंट्रोल असू नये असेही राहुल म्हणाले आहेत. मान यांनी केजरीवाल यांच्या रिमोट कंट्रोलने सरकार ऑपरेट करू नये, असा थेट वार राहुल गांधी यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सरकारने कोणीही शहीद झाले नसल्याचे सांगितले : यावेळी राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरही जोरदार हल्ला चढवला आहे. मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. या सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधातील आहेत. शेतात काम करणारा शेतकरी म्हणजे तपस्वी आहे. मात्र, संकटाच्या काळात त्यांचे कर्ज माफ होत नाही. तसेच, संन्याशी व्यक्तिंवरही हल्ले होत आहेत. ते कधी थांबणार असा प्रश्नही उपस्थित केला आहे. दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, यामध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्या दरम्यान, मी संसदेत दोन मिनिटे मौन पाळण्यास सांगितले होते. परंतु, सरकारने कोणीही शहीद झाले नसल्याचे सांगितले. वर्षभरानंतर पंतप्रधानांनी माफी मागून चूक झाल्याचे सांगितले. ते तसेच, या देशात जो तपश्चर्या करतो, त्याला त्याचे फळ मिळायला पाहिजे असही ते म्हणाले आहेत.
भारत जोडो यात्रेचा 30 जानेवारी रोजी समारोप : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी पंजाबमधील आदमपूर येथून पुन्हा सुरू झाली आहे. कडाक्याची थंडी असूनही राहुल गांधींसोबत शेकडो लोकांनी पदयात्रेत भाग घेतला आहे. काला बकरा भागातून सुरू झालेल्या पदयात्रेत राज्य युनिटचे प्रमुख अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांच्यासह पक्षाचे अनेक नेते गांधींसोबत चालताना दिसले. ही यात्रा आज रात्री उदमुर तांडा येथे विसावणार आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा समारोप 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये होणार आहे.