ETV Bharat / bharat

Pune ISIS Module Case: पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात एनआयएला मोठं यश, आठव्या आरोपीला अटक

Pune ISIS Module Case पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात एनआयला मोठं यश आलं आहे. पुण्यातून पळून गेलेल्या दहशतवाद्याला झारखंडमधून एनआयनं बेड्या ठोकल्या आहेत.

Pune ISIS Module Case
Pune ISIS Module Case
author img

By PTI

Published : Nov 3, 2023, 8:06 AM IST

नवी दिल्ली Pune ISIS Module Case- राष्ट्रीय तपाससंस्थेनं (NIA) पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरणात आठव्या आरोपीला गुरुवारी अटक केली. दहशतवादी गटाकडून चालविण्यात येणाऱ्या कारवायांबाबत एनआयकडून तपास सुरू आहे. पुण्यातून आठव्या आरोपीला अटक झाल्यानं एनआयच्या तपासात महत्त्वाचा दुवा हाती लागण्याची शक्यता आहे. मोहम्मद शाहनवाझ आलम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. हा दहशतवादी झारखंमधील हजारीबाग येथील रहिवाशी आहे.

दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी हा मोहम्मद शाहनवाझ आलम हा सक्रिय असल्याचा एनआयएला संशय आहे. एनआयच्या प्रवक्त्यानं म्हटलं की, पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरणात आलम हा थेट सहभागी होता. दहशतवाद्यांना लपण्याचं ठिकाण म्हणून वापरण्याच्या उद्देशानं हेरगिरी करण्यात आणि अद्ययावत स्फोटकसाठी साधने (आयईडी) तयार करण्यात दहशतवादी आलमनं सक्रिय भूमिका बजावली होती. तसंच गोळीबाराचे प्रशिक्षण देण्यासाठी त्यानं सक्रिय सहभाग नोंदविल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यानं दिली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांकडून कारवाई सुरू होताच हा आरोपी १९ जुलैला पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याला पोलिसांनी दुचाकी चोरताना रंगेहाथ पकडले होते. त्याच्याबरोबर मोहम्मद इमरान आणि मोहम्मद युनुस साकीला पोलिसांनी अटक केली होती. एनआयनं आरोपीला अटक करण्याकरिता ३ लाखांचे बक्षीस जाहीर केलं होतं.

एनआयएकडून सखोल तपास- आरोपींचा पुण्यातील इसिस मोड्युलमधून दहशतवादी कृत्य करण्याचा डाव होता, हे एनआयएला तपासात आढळून आले. दहशतवादी कृत्यातून सामाजिक शांतता आणि धार्मिक सलोखा बिघडविणं हे इसिसचे उद्दिष्ट आहे. इसिसकडून सातत्यानं भारतविरोधी मोहिम राबविली जाते. तसेच देशात हिंसाचार घडवून आणण्यासाठी विविध माध्यमांतून इसिसकडून आजवर प्रयत्न करण्यात आले आहेत. दहशतवाद्यांचे दहशत आणि हिंसाचार घडविण्याचा डाव उधळून लावण्यासाठी एनआयएकडून सखोल तपास करण्यात येत असल्याचं एनआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले.

स्लीपर सेलमधून दहशतवादी सक्रिय- अल-सुफा ही कट्टरतावादी विचारसरणी असलेली दहशतवादी संघटना आहे. यामधील भरकटलेले तरुण अल-सुफा कट्टर इस्लामिक विचारधारा आणि पद्धतींनी प्रेरित राहून दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलसारखे काम करतात. ही संघटना मुस्लिम समाजातील विवाहासारख्या कार्यक्रमांच्या विरोधातदेखील आहे. गेल्या 20 वर्षांपासून सक्रिय असलेली ही दहशतवादी संघटना मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातदेखील स्लीपर सेलच्या माध्यमातून सक्रिय आहे. त्यामुळे एनआयए, मध्य प्रदेश एटीएस, राजस्थान एटीएस आणि महाराष्ट्र एटीएस या संघटनांकडून या स्लीपर सेलवर सातत्यानं कारवाया करता येतात.

काय आहे दहशतवाद्यांचा उद्देश? एनआयनं यापूर्वी शामील साकिब नाचन झुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी, अब्दुल कादिर पठाण यांना अटक केली आहे. अटकेतील सर्व आरोपी इसिस स्लीपर मॉड्यूलचे आहेत. एनआयएच्या प्राथमिक तपासानुसार, नाचन इतर आरोपींनी पुण्यातील कोंढवा येथील एका घरात आयईडी एकत्र केले होते. मोठा घातपात घडवून आणण्याकरिता बॉम्ब (आयईडी) असेंब्ल केला होता. देशात इस्लामिक राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानं दहशत, हिंसाचार पसरवण्याची त्यांची योजना होती, असं एनआयएला तपासात आढळून आलं.

हेही वाचा-

  1. NIA Court Reject Salim Qureshi Bail : देश-विदेशात दहशतवादी कारवाया; 'डी गँग'चा गुंड सलीम कुरेशीचा जामीन अर्ज एनआयए कोर्टानं फेटाळला
  2. NIA Custody : आकिफ नाचणला 24 ऑगस्टपर्यंत तर शामिल नाचणला 23 ऑगस्टपर्यंत एनआयएची कोठडी
  3. Isis Module Case : चार वॉंटेड आरोपींवर ठेवलं लाखोंचं बक्षीस, इसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.