नवी दिल्ली - पुण्यातील थिंक्र टेक्नोलॉजी इंडिया प्राइवेट लिमिटेड या कंपनीने कोरोना व्हायरसला निष्क्रिय करणारे मास्क तयार केले असल्याची माहिती भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) दिली आहे. या मास्कमध्ये थ्रीडी प्रिंटींग आणि इतर औषधांचे मिश्रण वापरण्यात आले आहे. यासंदर्भात घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून हे मास्क कोरोना व्हायरसशी लढण्यास समर्थ असल्याचे सिद्ध झाले, असेही डीएसटी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
हे मास्क बनवण्यासाठी सोडियम ओलेफिन सल्फोनेट आधारित मिश्रणाचा वापर करण्यात आला आहे. हे सोडियम ओलेफिन सल्फोनेट साबणांमध्येही वापरण्यात येते. कोरोना व्हायरस या मास्कवरील केमिकलच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचा बाह्य पडदा नष्ट होतो. तसेच मास्कवर वापरण्यात येणारे केमिकल सामान्य तापमाणातही स्थिर राहतात.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात तंत्रज्ञान विकास मंडळाने व्यापारीकरणासाठी निवडलेल्या काही प्रकल्पांपैकी 'अँटीव्हायरल मास्क इनिशिएटिव्ह' हा एक प्रकल्प असल्याचे डीएसटीच्यावतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे एक महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे आम्ही हा प्रकल्प हातात घेतला असल्याचे थिंक्र टेक्नॉलॉजी इंडिया प्राइवेट लिमिटेडचे संस्थापक डॉ. शितलकुमार झांबड यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले. तसेच हा मास्क कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात मदत करेल असेही ते म्हणाले.
असा सुरु झाला प्रवास -
कोविडविरोधातील लढाईत नवनवीन उपाय शोधण्याच्या प्रक्रीयेअंतर्गत या प्रकल्पाला मे 2020 तंत्रज्ञान विकास मंडळाकडून अर्थसहाय्य देण्यात आले. त्यानुसार 8 जुलै, 2020 रोजी करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. हे किफायतशीर आणि अधिक कार्यक्षम मास्क कोविड 19 चा प्रसार रोखण्यात सामान्य एन 95, 3-प्लाय आणि कापडी मास्कचा तुलनेत अधिक प्रभावी आहेत, असा दावा 2016 मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीने केला आहे.
मास्क निर्मितीचा प्रवास -
याच उद्देशाने थिंक्र टेक्नोलॉजीने विषाणूरोधक कोटिंग फॉर्म्युलेशन विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले. नेरूळ इथल्या मर्क लाइफ सायन्सेसच्या सहकार्याने थिंक्र टेक्नोलॉजीजद्वारे ते विकसित केले गेले. यासाठी मर्क लाईफच्या संशोधन सुविधेचा वापर करण्यात आला. कोटिंग फॉर्म्युलेशनचा उपयोग फॅब्रिक थर कोटिंग करण्यासाठी केला आणि 3 डी प्रिंटिंग तत्त्व एकसंधपणा येण्यासाठी वापरले गेले. एन-95 मास्क 3 प्लाय मास्क , कपड्याचे मास्क, साध्या 3 डी प्रिंटेड किंवा इतर प्लास्टिक कव्हर मास्कमध्ये हा कोटेड लेयर पुन्हा वापरण्यायोग्य फिल्टरसह अतिरिक्त लेयर म्हणून समाविष्ट केला जाऊ शकतो. या पुन्हा वापरण्यायोग्य मास्कचे फिल्टरदेखील थ्रीडी प्रिंटिंग वापरुन विकसित केले आहेत. सार्स सीओव-2 विषाणू निष्क्रिय करण्यासाठी कोटिंगची चाचणी केली गेली आहे. कोटिंगसाठी वापरलेले साहित्य सोडियम ऑलेफिन सल्फोनेट आधारित मिश्रण आहे. साबण बनवण्यासाठी लागणारा हा घटक आहे ज्यात हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक गुणधर्म आहेत. विषाणूच्या संपर्कात आल्यावर तो विषाणूचा बाह्य पडदा विस्कळीत करतो. यात वापरलेली सामग्री साधारण तापमानात स्थिर आहे आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
मास्कमध्ये फिल्ट्रेशन कार्यक्षमता 95% पेक्षा जास्त -
हे मास्क फिल्ट्रेशन पेक्षा अधिक संरक्षण प्रदान करतात. या मास्कमध्ये जीवाणू फिल्ट्रेशन कार्यक्षमता 95% पेक्षा जास्त आहे. 'या प्रकल्पात प्रथमच आम्ही 3 डी प्रिंटर्सचा वापर केला आहे. ज्यामुळे प्लास्टिक-मोल्डेड किंवा 3 डी प्रिंटेड मास्क कव्हरवर मल्टीलेयर कापड फिल्टर तंतोतंत बसतील. थिंकर टेक्नोलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने या उत्पादनाच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे. आम्ही एका खासगी कंपनीबरोबर उत्पादनासाठी करार केला आहे आणि व्यावसायिक उत्पादनदेखील सुरू झाले आहे, असे ही यावेळी झांबड यांनी सांगितले. दरम्यान, एका स्वयंसेवी संस्थेने नंदुरबार, नाशिक आणि बेंगळुरू ये चार सरकारी रुग्णालयांमधील आरोग्यसेवा कामगारांच्या वापरासाठी आणि बंगळुरुमधील मुलींच्या शाळा आणि महाविद्यालयात देखील 6,000 मास्क वितरित केले आहेत.
हेही वाचा - राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडेच