बेगूसराय - बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात एका सायकोने चांगलीच दहशत पसरवली आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल आठ लोकांवर त्याने गोळीबार केला आहे. ही घटना तेघडा आणि बछवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्यांना तेथील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच, या आठ लोकांमधील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायको किलरने लोकांना वाटेत गोळ्या घालून जखमी केले आहे. या गोळीबारानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. ही घटना बच्वारा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. जखमींमध्ये अमरजीत कुमार, गौतम कुमार, नितीश कुमार, विशाल कुमार आणि दीपक कुमार यांचा समावेश आहे.
मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी ही घटना घडवली. या घटनेबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यासंदर्भात बेगुसरायचे एसपी योगेंद्र कुमार म्हणाले की, मोटारसायकलवरून आलेल्या दोन लोकांकडून लोकांना लक्ष्य केले जात आहे. दोघेही सायको असल्याचे दिसते. बेगुसरायचे एसपी योगेंद्र कुमार यांनी सांगितले की, सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट करण्यात आले आहे. ठिकठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, चकिया पोलिस स्टेशन हद्दीतील मल्हीपूर बसस्थानकाजवळ 3 जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. तर, चकियाजवळ दोन जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. सायको किलर या परिसरात सातत्याने मोठमोठ्या घटना घडवत आहेत. याआधीही तेघरा आणि बचवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यासोबतच पोलिसांनी लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.