ETV Bharat / bharat

७३ वर्षीय प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या सिंहासनावर बसणारे सर्वात वयोवृद्ध राजा ठरणार - ब्रिटनचे सिंहासन

ब्रिटनच्या सिंहासनावर (British throne) बसण्यासाठी जीवनभर तयारी केल्यानंतर अखेर वयाच्या ७३ व्या वर्षी प्रिन्स चार्ल्स (Prince Charles 73) यांना महाराज चार्ल्स तिसरा म्हणून देशाच्या गादीवर बसण्याची संधी मिळाली आहे. चार्ल्स हे ब्रिटनच्या सिंहासनावर बसणारे सर्वात वयस्कर राजा असतील.(will become the oldest monarch to sit on the British throne)

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Sep 9, 2022, 11:30 AM IST

Updated : Sep 9, 2022, 11:46 AM IST

लंडन: ब्रिटनच्या सिंहासनाची (British throne) आयुष्यभर तयारी केल्यानंतर वयाच्या ७३ व्या वर्षी प्रिन्स चार्ल्स यांना अखेर 'हर मॅजेस्टी चार्ल्स तिसरा'(Maharaj Charles III) म्हणून देशाच्या सिंहासनावर बसण्याची संधी मिळाली आहे. चार्ल्स हा ब्रिटनच्या सिंहासनावर बसणारे सर्वात वयस्कर राजा असतील. गुरुवारी त्यांची आई राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ते देशाचे पुढील राजा बनले आहेत. ब्रिटीश राजेशाहीच्या अधिकार्‍यांच्या मते, चार्ल्स 'किंग चार्ल्स तिसरा' याच्या नावाने सिंहासनावर बसतील.

चार्ल्संच्या राज्याभिषेकाची तारीख अद्याप ठरलेली नाही. जन्मासोबतच देशाचे सिंहासन घेण्याची तयारी सुरू केलेल्या चार्ल्सने ब्रिटिश राजेशाहीच्या आधुनिकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चार्ल्स हे असे पहिले राजेशाही वारस आहेत ज्यांचे शिक्षण घरी झालेले नाही, तस त्यांनी युनिव्हर्सिटी मधे जाऊन पदवी मिळवली आहे. राजघराणे आणि सामान्यांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अतिशय लोकप्रिय प्रिन्सेस डायनासोबत वादग्रस्त घटस्फोट घेतला. राजघराण्यातील सदस्यांना सार्वजनिक व्यवहारात हस्तक्षेप करण्यापासून रोखणाऱ्या नियमाकडेही त्यांनी अनेकदा दुर्लक्ष केले. पर्यावरण संरक्षण, वास्तू संवर्धन या विषयांवर त्यांनी मोकळेपणाने चर्चा केली.

Last Updated : Sep 9, 2022, 11:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.