नवी दिल्ली : 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवनिर्मित संसद भवन राष्ट्राला समर्पित करतील. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच त्यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले. नवीन संसद भवनाचे बांधकाम आता पूर्ण झाले आणि नवीन इमारत आत्मनिर्भर भारताच्या भावनेचे प्रतीक असल्याचे लोकसभा सचिवालयाने म्हटले आहे.
नवनिर्मित दर्जेदार ईमारत : 5 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभा, राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी संसदेसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी सरकारला विनंती केली होती. यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली. संसदेची नवनिर्मित इमारत विक्रमी वेळेत दर्जेदारपणे तयार करण्यात आली आहे. चार मजली संसद भवनात 1 हजार 224 खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आता संसदेची नवनिर्मित इमारत भारताच्या गौरवशाली लोकशाही परंपरा आणि घटनात्मक मूल्यांना अधिक समृद्ध करण्याचे काम करेल. यासोबतच अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतीमुळे सभासदांना त्यांचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल.
सुरक्षेसाठी ठोस व्यवस्था : नवीन संसद भवनासाठी मार्शल यांच्याकडे नवीन ड्रेस कोड असेल. येथे सुरक्षेसाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाची अचानक पाहणी केली होती. तसेच येथे सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली होती. नवीन संसद भवनात तासाभराहून अधिक काळ थांबलेल्या पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांशीही चर्चा केली होती.
लोकसभेत 888 सदस्य बसू शकतील : संसदेच्या सध्याच्या इमारतीत लोकसभेतील 550 तर राज्यसभेत 250 सन्माननीय सदस्यांची बैठक घेण्याची व्यवस्था आहे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीत लोकसभेतील 888 आणि राज्यसभेतील 384 सदस्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन लोकसभेच्या सभागृहातच होणार आहे. संसद सदस्यांसाठी एक विश्रामगृह, एक लायब्ररी, अनेक समिती खोल्या, जेवनासह पुरेशी पार्किंगची जागा देखील असेल.
नवीन संसदेचा एकुण खर्च : नवीन संसद बांधण्याचे टेंडर टाटा प्रकल्पाला सप्टेंबर 2020 मध्ये देण्यात आले होते. त्याची किंमत 861 कोटी रुपये मानली जात होती. नंतर काही अतिरिक्त कामांमुळे ही किंमत १ हजार २०० कोटींवर पोहोचली होती.
काँग्रेसवर निशाणा साधला होता : नव्या संसदेची घोषणा झाल्यापासून काँग्रेसने त्यावर निशाणा साधला होता. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी नवी संसद तसेच सेंट्रल व्हिस्टाच्या संपूर्ण प्रकल्पाला पैशाची उधळपट्टी म्हटले आहे. उद्घाटनाच्या तारखेनंतरही जयराम रमेश ट्विट करून टोमणे मारत आहेत. पीएम मोदींचा फोटो पोस्ट करत जयराम म्हणाले की, 28 मे रोजी उद्घाटन होणाऱ्या नवीन संसद भवनाचे ते एकमेव आर्किटेक्ट, डिझायनर आहेत. त्यांनी याला मोदींच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा प्रकल्प म्हटले.
हेही वाचा -
- Tulja Bhavani Temple News : अंगावर तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना तुळजापूर मंदिरात दर्शनास मनाई
- SC verdict on Jallikattu bullock cart: हुर्रे.. बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी, शर्यती घेण्याचा मार्ग मोकळा
- Law Minister of country: किरेन रिजीजू यांना कायदेमंत्री पदावरून हटविले; अर्जुन मेघवाल देशाचे नवे कायदा