ETV Bharat / bharat

PM Modi On Opposition : 'देश आपल्याबरोबर आहे' मणिपूरवासियांना मोदींनी दिला विश्वास, काँग्रेसचे काढले वाभाडे - डिजिटल डेटा प्रोटेक्शन बिल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला लोकसभेत जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी मोदी मणिपूरवासियांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, 'देश आपल्याबरोबर आहे.' सरकार आपल्याबरोबर आहे. त्यांनी यावेळी मणिपूरवासियांना शांततेचे आवाहन केले. त्याचवेळी काँग्रेसचे मोदींनी थेटपणे वाभाडे काढले.

PM Modi On Opposition
PM Modi On Opposition
author img

By

Published : Aug 10, 2023, 5:32 PM IST

Updated : Aug 10, 2023, 10:24 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उत्तर देताना

नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव सभागृहात फेटाळण्यात आला आहे. अविश्वास ठराव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि भारताच्या विरोधी आघाडीवर (I.N.D.I.A.) जोरदार टीका केली. यूपीएपासून भारतापर्यंत त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.

अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. मोदी हे नीरव मोदी म्हणून देशात राहत असल्याचे विधान त्यांनी केले. त्यामुळे भाजप खासदारांनी मोठा गोंधळ घातला. अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे लोकसभेत मोठा गदारोळ झाला. अधीर रंजन यांनीही माफी मागावी अशी मागणी भाजपने केली. मात्र, विरोधकांना चर्चा नको, गोंधळ हवा, अशी टीका केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली.

  • #WATCH | PM Modi says, "People of the country have no confidence in Congress. Due to arrogance, they are not able to see the reality. In Tamil Nadu, they won in 1962 and since 1962 the people of Tamil Nadu are saying 'No Congress'. In West Bengal they won in 1972, people of West… pic.twitter.com/8xHvTcIIKm

    — ANI (@ANI) August 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मणिपूरवासियांना शांततेचे आवाहन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवासियांना शांततेचे आवाहन केले. देश आणि सरकार मणिपूरच्या जनतेसोबत असल्याचे मोदी म्हणाले. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले. देश आपल्याबरोबर असल्याचे मणिपूरवासियांना मोदींनी आश्वासन दिले. देशाच्या नागरिकांनी सरकारबद्दल कायम विश्वास दाखवला आहे. मी देवाचे आभार मानतो की, विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्याची देवाने बुद्धी दिली. जनता आमच्या सरकारसोबत उभी आहे, असे देखील मोदींनी अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना म्हटले आहे. विविध विधेयके आम्ही संसदेत पारित केली. आज मी जनतेचे आभार मानण्यासाठी संसेदत उभा आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले.

  • #WATCH | Prime Minister Narendra Modi takes on I.N.D.I.A. alliance; says, "Their trouble is such that they had to take the support of NDA to keep themselves alive. But, out of habit, the arrogance of 'I' doesn't leave them alone. That is why, they inserted two 'I's of arrogance… pic.twitter.com/3WP8SfXZ4i

विरोधकांना फक्त राजकारणात रस : विरोधकांच्या प्रस्तावावर तीन दिवसांपासून संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी गांभीर्याने सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला असता तर बरे झाले असते, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. यापूर्वी दोन्ही सभागृहांनी जनविश्वास विधेयक, वैद्यकीय विधेयक, ( Medical Bill ) दंत आयोग विधेयक ( Dental Commission Bill ), आदिवासी विधेयक, डिजिटल डेटा संरक्षण विधेयक ( Digital Data Protection Bill ) अशी अनेक महत्त्वाची विधेयके येथे मंजूर केली आहेत. केरळला सर्वाधिक फायदा होणारे मत्स्योत्पादनासाठीचे विधेयकही पारित केले ते विधेयकही विरोधकांनी गांभीर्याने घेतले नाही, अशी टीका मोदींनी केली.

विरोधकांनी जनतेचा विश्वासघात केला : तरुणांना नवी दिशा देणारी विधेयके संसदेत मांडण्यात आली. डिजिटल डेटा प्रोटेक्शन बिल ( Digital Data Protection Bill ) तंत्रज्ञानावर आधारित आहे. सर्व बिले, आदिवासी, दलित, गरीब, मागास नागरिकांसाठी होती. मात्र, विरोधकांनी यात रस दाखवला नाही. ज्या कामासाठी देशातील जनतेने त्यांना येथे पाठवले, त्या जनतेचाही विरोधकांनी विश्वासघात केला आहे. काही विरोधी पक्षांना, देशापेक्षा त्यांचा पक्ष अधिक महत्त्वाचा आहे, हे त्यांच्या वागण्याने सिद्ध झाले आहे. देशापुढे त्यांच्यासाठी पक्षाला प्राधान्य आहे. विरोधकांनी त्यांच्या वागण्यावरुन हे सिद्ध केले आहे की, त्यांना जनतेची चिंता नसून सत्तेची चिंता असल्याची टीका मोदी यांनी विरोधकांवर केली आहे. देशापेक्षा विरोधकांना त्यांचा पक्ष मोठा वाटतो. देशात गरिबी आहे, मात्र विरोधकांना त्याबद्दल काहीच वाटत नसल्याची खंत देखील मोदींनी व्यक्त केली आहे.

सत्ताधारी बाकांकडून चौके-छक्के : यावेळी मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेससह विरोधकांनी थोडा अभ्यास करुन येण्याची गरज होती. विरोधकांना अभ्यास करण्यासाठी २०१८ नंतर 5 वर्षे दिली तरी, त्यांचा अभ्यास पूर्ण झाला नाही. विरोधकांनी देशाला निराशेशिवाय काहीच दिले नाही. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला, मात्र आमच्या खासदारांनी जोरदार बॅटींग केल्याचे मोदी म्हणाले. फिल्डिंग विरोधकांनी लावली मात्र, सत्ताधारी बाकांकडून चौके-छक्के लावले गेले, असे मोदी म्हणाले.

अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ : संसदेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या तिसऱ्या दिवशी (गुरुवार, १० ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. पंतप्रधान म्हणाले की, सर्वांनी आपापली मते मांडली आहेत. 2018 मध्ये विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यानंतर एनडीएला निवडणुकीत जास्त जागा मिळाल्या. एक प्रकारे विरोधकांचा अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ आहे. तर काँग्रेसने विरोधी आघाडीच्या नावाला कर्नाटकातच तिलांजली दिल्याची टीका केली.

देशाच्या प्रगतीवर विरोधकांचा अविश्वास : आयएमएफच्या अहवालावर नजर टाकली तर कळते की, भारतातील गरिबी जवळजवळ संपत आली आहे. भारताच्या समाजकल्याण योजनेसाठी हा एक चमत्कार असल्याचे सांगितले जाते. जल जीवन योजनेतून ४ लाख नागरिकांचे जीव वाचवले असल्याचे WHO ने म्हटले आहे. हे चार लाख नागरिक गरीब, पीडित, वंचित आहेत. स्वच्छ भारतामुळे गरिबांची दरवर्षी ५० हजार रुपयांची बचत होत आहे. काँग्रेससह विरोधी गटातील काही पक्षांना भारताच्या कामगिरीवर अविश्वास आहे, अशी टीका मोदींनी कॉंग्रेसवर केली आहे.

काँग्रेसवर अविश्वास : अविश्वासामुळे देशाच्या अनेक भागांत काँग्रेसला विजय मिळवण्यासाठी अनेक दशके लागत आहेत. तामिळनाडूमध्ये काँग्रेसने शेवटचा विजय 1962 मध्ये मिळवला होता. 61 वर्षांपासून तिथले लोक काँग्रेसवर अविश्वास असल्याचे दाखवून देत आहेत. 1972 मध्ये बंगालमध्ये ते शेवटचे जिंकले. 51 वर्षे तिथली जनता काँग्रेसवर अविश्वास दाखवते आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, बिहारमध्ये 1985 मध्ये काँग्रेस जिंकली होती. 38 वर्षे तिथल्या जनतेने काँग्रेसवर अविश्वास दाखवला. त्रिपुरात शेवटचा विजय 1988 मध्ये झाला होता. तेथील जनता 35 वर्षांपासून हेच ​​म्हणत आहे. ओडिशा 1995 मध्ये शेवटच्यावेळी काँग्रेस जिंकली होती. 28 वर्षांपासून तिथले लोक काँग्रेसवर अविश्वास दाखवता आहेत, अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली आहे.

हेही वाचा - Monsoon Session 2023 Live : विरोधक 'गुड का गोबर बनाने में माहीर' - पंतप्रधान मोदी

Last Updated : Aug 10, 2023, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.