ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल लोकचे उद्घाटन, मोदींनी मंदिरात केली महाकालेश्वराची महापूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकाल लोकचे आज मंगळवार (दि. 11 ऑक्टोबर)रोजी उद्घाटन केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी महाकाल कॉरिडॉरमध्ये फिरून पाहिला. तत्पूर्वी उज्जैनच्या महाकाल मंदिरात विधिवत पूजा केली. श्री महाकाल लोकोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त उज्जैनमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसर भव्य पद्धतीने सजवण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल लोकचे उद्घाटन

author img

By

Published : Oct 11, 2022, 6:42 PM IST

Updated : Oct 11, 2022, 9:30 PM IST

उज्जैन -जय जय महाकाल..! अशा जयघोषात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैनमधील ज्योतिर्लिंग महाकालेश्वर ‘महाकाल लोक’च्या नवीन संकुलाचे लोकार्पण केले. यावेळी सर्वत्र मंत्राचा प्रतिध्वनी ऐकायला येवू लागला. रक्षासूत्रापासून (कळव) बनवलेल्या १५ फूट उंचीच्या शिवलिंगाच्या प्रतिकृतीवरील रिमोटद्वारे पडदा हटवून मोदींनी लोकार्पण केले. अध्यात्माचे हे नवे प्रांगण सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल लोकचे उद्घाटन,

मंदिराच्या गर्भगृहात पूजा - तत्पूर्वी मोदींनी महाकालाचे दर्शन घेऊन प्रणाम केला. महाकालाला चंदन, मोगरे आणि गुलाबाची माळ अर्पण करून पवित्र धागा अर्पण केला. सुका मेवा, फळे अर्पण केली. दक्षिणा दिली. सायंकाळच्या आरतीतही ते सहभागी झाले. महाकालच्या दक्षिण दिशेला बसून रुद्राक्ष जपमाळ लावून तीन मिनिटे ध्यानधारणा केली. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ‘महाकाल लोक’च्या नवीन दर्शन संकुलाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्जैन येथे पोहोचले. ते प्रथम अहमदाबादहून विशेष विमानाने इंदूर आणि तेथून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने उज्जैनला पोहोचले. हेलिपॅडवरून पंतप्रधान मोदी थेट महाकाल मंदिरात पोहोचले. गर्भगृहात नंदीला नमस्कार करून महाकालाचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिराच्या गर्भगृहात पूजेला सुरुवात झाली आहे.

क्षिप्रा नदीच्या काठावर सर्वत्र स्क्रीन लावले गेले - मोदी उज्जैनमध्ये सुमारे ३ तास कार्यक्रमस्थळी थांबले. सायंकाळी ६.३० वाजता उज्जैनमध्ये सुमारे २०० संतांच्या उपस्थितीत त्यांनी ‘महाकाल लोक’चे उद्घाटन केले. कार्यक्रमस्थळी वॉटर प्रूफ डोम बांधण्यात आला असून, तेथे ६० हजार लोक उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान क्षिप्रा नदीच्या काठावर हा कार्यक्रम दाखवण्यासाठी मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. येथे सुमारे एक लाख लोक जमण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम ४० देशांमध्ये थेट दाखवला जात आहे.

८५६ कोटींचा निधी, दोन टप्यात प्रकल्पाचा विकास - वाराणसीतील काशी विश्वनाथानंतर देशातील दुसरे ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराचे नवे रूप बहरले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह दोनशे संत महतांच्या आणि सुमारे ६० हजार लोकांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी ‘महाकाल लोक’ चे लोकार्पण झाले. महाकाल लोक प्रकल्प ८५६ कोटींचा निधी खर्चून दोन टप्प्यात विकसित करण्यात आला. २.८ हेक्टरमध्ये पसरलेले महाकाल संकुल आता ४७ हेक्टरचे झाले आहे. यात ९४६ मीटर लांबीचा कॉरिडॉर असणार आहे. ज्यामुळे भाविक थेट मंदिराच्या गर्भगृहात पोहोचणार आहेत.

Last Updated : Oct 11, 2022, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.