जम्मू - पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी ते आज नौशेरा सेक्टरमध्ये दाखल झाले आहेत. नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यातील अनेक भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींचे जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचे ठिकाण केव्हाही बदलू शकते. कारण सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सुरक्षेच्या हेतूने गुप्तता ठेवली जाते.
यापूर्वीही पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. यापूर्वी 2019 मध्ये आर्टिकल 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये दिवाळी साजरी केली होती.
2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदींनी श्रीनगरमधील पूरग्रस्तांची भेट घेण्याबरोबरच लडाख भागातील सियाचीन येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. 2017च्या दिवाळीत त्यांनी उत्तर काश्मीरच्या गुरेझ सेक्टरला भेट दिली होती. 2015 मध्ये भारत-पाक युद्धाला 50 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिवाळीच्या दिवशी पंजाब सीमेवर भेट दिली होती.
हेही वाचा - राज्यभरात उत्साहात लक्ष्मीपूजन साजरे..