नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्या पोस्ट-बजेट वेबिनारला संबोधित करणार आहेत. सकाळी 10 वाजता, मी पोस्ट-बजेट वेबिनारला संबोधित करेन. जे या वर्षीच्या अर्थसंकल्पातील हरितक्रांतीच्या वाढीशी संबंधित पैलूंवर लक्ष केंद्रित करेल, असे पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
वेबिनारमधून विकासाला चालना देण्याची इच्छा : ऊर्जा क्षेत्राबद्दल आणि शाश्वत विकासाला चालना देण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना त्यांनी वेबिनारमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्पना आणि सूचना मिळविण्यासाठी सरकारद्वारे आयोजित केलेल्या 12 पोस्ट-बजेट वेबिनारच्या मालिकेतील हे पहिले वेबिनार आहे.
अर्थसंकल्पात विशेष तरतूदी : वेबिनारमध्ये सहा ब्रेकआउट सत्रे असतील. ज्यामध्ये ग्रीन ग्रोथचे ऊर्जा आणि ऊर्जा नसलेले घटक समाविष्ट आहेत. या वेबिनारसाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालय हे प्रमुख मंत्रालय आहे. देशात शेती, औद्योगिक, आर्थिक, पर्यावरणपूरक शेती आणि शाश्वत ऊर्जा यांमध्ये स्थिरता आणण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 च्या सात सर्वोच्च प्राधान्यांपैकी हरित वाढ ही एक आहे.
प्रकल्प आणि उपक्रमांची कल्पना : यातून मोठ्या प्रमाणात नोकऱ्याही निर्माण होतील. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रे आणि मंत्रालयांमध्ये पसरलेल्या अनेक प्रकल्प आणि उपक्रमांची कल्पना केली आहे. जसेकी यात हरित हायड्रोजन मिशन, ऊर्जा संक्रमण, ऊर्जा साठवण प्रकल्प, अक्षय ऊर्जा निर्वासन,पीएम-प्रणाम, गोबरधन योजना, भारतीय प्राकृतिक खेती बायो-इनपुट. संसाधन केंद्रे, मिष्टी, अमृत धरोहर, कोस्टल शिपिंग आणि व्हेईकल रिप्लेसमेंट अशा प्रकल्प आणि उपक्रमांचा समावेश आहे.
वेबिनार 11 मार्चपर्यंत सुरू : या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केल्याप्रमाणे आयोजित केलेले वेबिनार 11 मार्चपर्यंत सुरू राहतील, असे वित्त मंत्रालयाने बुधवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ही मालिका २०२१च्या जन भागीदारी म्हणजेच लोकसहभाग या कल्पनेतून सुरू करण्यात आली होती. जन भागीदारीच्या भावनेने, सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसहभागाला चालना देण्यासाठी कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिक आपल्या पंप्रधान मोदींपासून प्रेरणा घेऊ शकतील असे मंत्रालयाने म्हटले आहे.